
नागपूर : सावनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भन्साळी टाकळी येथे मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास कार आणि दुचाकीमध्ये धडक झाली. या अपघातात कोदेगाव येथील रहिवासी विवेक राऊत जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, विवेक राऊत हे आपल्या दुचाकी क्रमांक एमएच ४० डी जे ०२७० ने टाकळी येथे आजोबांना आणण्यासाठी जात होते. याचदरम्यान एमपी २८ सीबी १०४७ क्रमांकाच्या कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीचे मोठे नुकसान झाले असून, विवेक राऊत जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच हितेश बनसोड यांच्या नेतृत्वाखाली हितज्योती आधार फाउंडेशनचे पथक घटनास्थळी पोहोचले. पथकाने जखमी विवेक राऊत यांना मदत केली आणि त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पोहोचविण्यास पुढाकार घेतला.
या अपघातप्रकरणी सावनेर पोलीस पुढील तपास करीत आहेत.



