Published On : Tue, Sep 25th, 2018

संस्कार शाश्वत, मानव परिवर्तशील : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Advertisement

नागपूर : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या जामठा येथील ब्रह्माकुमारीज रिट्रीट एवं ट्रेनिंग सेंटर ‘विश्व शांति सरोवर’चे रविवारी दादी जानकीजी यांच्याहस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी आध्यात्मिक स्नेहमिलन कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेयरमैन माजी खासदार विजय दर्डा आणि मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष विरेंद्र कुकरेजा प्रामुख्याने उपस्थित होते. मंचावर राजयोगिनी दादीजी जानकीजी यांच्यासमावेत आंतरराष्ट्रीय वक्ता ऊषा दिदी, संतोष दिदी, हंसाबेन आणि नागपूर केंद्राच्या संचालिका रजनी दिदी उपस्थित होत्या.

यावेळी मान्यवरांनी वास्तुची पाहणी केली व प्रजापिता ब्रम्हा बाबा यांच्या कक्षात शांततेचा अनुभव घेतला. यावेळी नितीन गडकरी म्हणाले, आपले संस्कार शाश्वत आहे, मात्र मानव परिवर्तनशील आहे. आध्यात्माच्या माध्यमातून मार्ग भटकलेल्या मनुष्याला संस्कारीत केले जाऊ शकते. भारतीय संस्कृतीने संपूर्ण विश्वाला हा नवा विचार दिला आहे. साधू-संतांनी दिलेले मंत्र हेच यशाचे मार्ग आहेत. आध्यात्मिक मार्ग हा जीवनाला बदलविणारा मार्ग आहे. भारताजवळ जगाला दिशा देण्याची क्षमता आहे. दादी जानकीजी व त्यांच्या आधीच्या संतांनी लोकांमध्ये चेतना जागविली आहे. त्यामुळेच सामाजिक परिवर्तन दिसून येत आहे. युरोपात कुटुंब तुटत आहेत आणि भारतातील कुटुंब पद्धत सुदृढ आहे. देशात गरीब असो की श्रीमंत, त्यांच्यात असलेल्या संस्कारामुळे सामूहिक कुटुंब टिकून असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

मनुष्य नैतिक मूल्य व संस्कारांना विसरत चालला
विजय दर्डा यांनी यावेळी संबोधित करताना, प्रजापिता ब्रम्हा बाबा यांनी हिंसा, भेद, द्वेषमुक्त समाजाची कल्पना केली होती. आध्यात्मिक मार्गाने चालणारे विश्व त्यांना साकार होताना पाहायचे होते. याच उद्देशाने त्यांनी या विश्वविद्यालयाची स्थापना केली. विश्वाला आज संस्काराची अत्यंत आवश्यकता आहे. मानवाने भौतिक विकास साधला, मात्र तो नैतिक मूल्य व संस्कारांना विसरत चालला आहे. याच कारणाने जगात हिंसा, अनैतिकता व विषमता यासारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत. भगवान महावीर यांचे मत होते की, विश्वाला बदलायचे असेल तर मनुष्याचे हृदय बदलावे लागेल.

सर्व मनुष्य प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाने दाखविलेल्या मार्गाने चालायला लागले तर राग, द्वेष नसलेल्या विश्वाची स्थापना व्हायला वेळ लागणार नाही. आपसातील बंधुभावाची भावना प्रवाहित होईल आणि पृथ्वी ब्रम्हांडातील सर्वात आदर्श स्थान ठरेल. विश्व शांती सरोवराच्या माध्यमातून विदर्भात नैतिक मूल्य व आध्यात्मिक संस्काराची गंगा वाहिल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी विदर्भाच्या माजी संचालिका पुष्पाराणी दिदी यांचे स्मरण करीत त्यांना नमन केले.

गंगा शुद्धीचा मागितला आशीर्वाद
कार्यक्रमापूर्वी नितीन गडकरी व विजय दर्डा यांनी दादी जानकीजी यांच्याशी भेट केली. यावेळी गडकरी यांनी दादीजी यांच्याकडून गंगा शुद्धीकरणासाठी आशीर्वाद मागितला. सोबतच ब्रह्मकुमारीज यांच्याकडून सहयोगासाठी आग्रह केला. यावर दादी जानकीजी म्हणाल्या, जेथे चांगल काही करण्याची भावना असते, तेव्हा कोणतेही कार्य सोपे होते. जीवनात पावित्र्य, सत्यता, धीर, मधुरता व सहनशीलता आवश्यक आहे. भावना चांगली असेल तर सर्व सोपे आणि सहज होते.

२५ वर्षांपर्यंत वीज नि:शुलक
सकाळी विश्व शांति सरोवराचे उद््घाटन दादी जानकीजी यांच्यासमवेत राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ब्रह्माकुमारीजच्या महाराष्ट्र झोनच्या प्रमुख संतोष दीदी, आंतरराष्ट्रीय वक्ता उर्षा दीदी, हैदराबाद येथील शांती सरोवरच्या संचालिका कुलदीप दीदीजी, हिसार-हरियानाच्या संचालिका रमेश दीदी, नागपूर केंद्राच्या संचालिका रजनी दिदी, महापौर नंदा जिचकार, जिल्हापरिषद अध्यक्षा निशा सावरकर, उद्योजक सुशील अग्रवाल, युवा प्रभागाचे मुख्यालय संयोजक आत्मप्रकाश भाई, भरतभाई, खासदार विकास महात्मे, माजी खासदार अजय संचेती, आमदार डॉ. मिलिंद माने व परिणय फुके, मनपा स्थायी समिति अध्यक्ष विरेंद्र कुकरेजा, माजी आमदार मोहन मते मचावर उपस्थित होते.

कार्यक्रमाला संबोधित करताना बावनकुळे म्हणाले, आपली संस्कृती हाच आपला वारसा आहे. या भव्य वास्तुत आध्यात्माचे कार्य होणार आहे. हे लक्षात घेता येथे सरकारकडून सोलर प्रोजेक्ट लावण्यात येईल. २५ वर्षापर्यंत चीज नि:शुल्क देण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. यादरम्यान दादी जानकी यांनी विश्व शांती सरोवराला चांदीचा कलश भेट रुपात दिला. यावेळी सुशील अग्रवाल, सत्येंद्र गुप्ता, डॉ. दिलीप मसेजी, शंकर घिमे, जितेंद्र रहांगडाले, प्रकाश तरोळे यांनी दादीजी यांना प्रतिक रुपात चांदीचा कलश भेट केला. मनीषा दीदी यांनी संचालन केले. प्रेमप्रकाश भाई यांनी आभार मानले. याप्रसंगी माउंट आबू स्थित मुख्यालयाचे १०८ ब्रह्मकुमार भाऊ