नागपूर : नागपूर महानगरपालिकेद्वारे ‘जागतिक सायकल दिनाचे’ औचित्यसाधून यशवंत स्टेडियम येथे घेण्यात आलेल्या सायकल एक्स्पोमध्ये चीप सायकल स्टोअर्सच्या वतीने लकी ड्रॉ ठेवण्यात आलेला होता. यामध्ये संकेत रवी बावनकर व शुभांगी सुपारे विजेते ठरले. या दोन्ही विजेत्यांना गुरुवार (ता १५) रोजी मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी यांच्या हस्ते “गँग व्हीएक्स” ही सायकल सुपूर्द करण्यात आली.
मनपा मुख्ययलातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील दालनात आयोजित छोट्याखानी कार्यक्रमात मनपाचे क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर, चीप सायकल स्टोअर्सचे हितेश कोठारी दोन्ही विजेते संकेत बावनकर, कु. शुभांगी सुपारे यांच्यासह मनपा अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. चीप सायकल स्टोअर्सचेतर्फे विजेत्यांना सायकल प्रदान करण्यात आली आहे.
नागपूर शहराला स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ साकारत असतांना पर्यावरणात कार्बनचे उत्सर्जन कमी व्हावे आणि नागरिकांचे स्वास्थ्य देखील सुदृढ राहावे या उद्देशाने ‘जागतिक सायकल दिनाचे’ औचित्यसाधून महानगरपालिकेतर्फे शहरातील सायकलपटूंच्या सहकार्याने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीच्या अनुषंगाने यशवंत स्टेडियम येथे दोन दिवसीय मनपा सायकल एक्स्पोचे घेण्यात आला असून, एक्स्पोत लकी ड्रॉ काढण्यात आला होता. या लकी ड्रॉच्या विजेत्यांची घोषणा सायकल रॅलीच्या दिवशी आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी केली होती. त्या अनुषंगाने विजेत्यांना सायकल सुपूर्द करण्यात आली. याशिवाय विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
तत्पूर्वी मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात सायकल रॅली साठी सहकार्य केलेल्या विविध संस्थांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यात विवेका हॉस्पिटल, इंडो ग्लोबल सोसिअल सर्व्हिस सोसायटी, सोल फिटनेस झुंबा क्लब, व्ही.एन. रेड्डी फाउंडेशन याच्या प्रतिनिधींना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.