मुंबईचे खासदार राहुल शेवाळे हे गडचिरोलीला जाणार, ठाण्याचे खासदार राजन विचारे हे गोंदियाला जणार अशी माहिती त्यांनी दिली.
नागपूर: शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच नागपूरात दाखल झाले आहेत. शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानानिमित्त राऊत हे नागपूरात आले आहेत. यावेळी त्यांना शिवसंपर्क अभियानाबाबत माहिती देताना म्हटलं की, शिवसेनेच्या सर्व खासदारांनी मराठवाडा आणि विदर्भ या भागात चार दिवस दौरे करावेत, तिथल्या जनतेशी आणि पत्रकारांशी बोलावं म्हणून पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आदेशानुसार मी नागपूरात आलो आहे असं राऊत म्हणाले.
कृपाल तुमाने हे रामटेकचे इथे आहेत, मुंबईचे खासदार राहुल शेवाळे हे गडचिरोलीला जाणार, ठाण्याचे खासदार राजन विचारे हे गोंदियाला जणार अशी माहिती त्यांनी दिली. खासदार भावना गवळींबाबत राऊत म्हणाले की, भावना गवळी यांनी रीतसर परवानगी घेतली आहे, ईडीच्या चौकशीसाठी त्या जाणार आहेत, त्यामुळे त्या दिसणार नाहीत, अरविंद सावंत आहेत तिकडे बैठका घेणार आहेत. विदर्भ आणि मराठवाड्यात शिवसेनेच्या खासदारांनी चार दिवस जावं, पदाधिकारी, पत्रकारांशी संवाद साधण्याचा आदेश उद्धव ठाकरे यांचा होता. त्याप्रमाणे आम्ही इथे आलोय. अधिवेशन सुरु असल्याने नागपूरचे सर्व प्रमुख नेते मुंबईत आहेत. संसदेचं अधिवेशन सुरु असल्याने प्रमुख नेते दिल्लीत आहे. आम्ही संघटनेसाठी इथे आलोय असं राऊत म्हणाले.
पुढे राऊत म्हणाले की, संघटन ही शिवसेनेची प्रमुख ताकद आहे. तीन पक्षाचं सरकार असलं तरीही सेना महत्त्वाचा पक्ष आहे. पक्ष संघटनेच्यावतीने ताकदीवर आम्ही काम करतोय. येणाऱ्या काळात जिथे शिवसेना लढू शकली नाही, त्या लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघात पक्षाला ताकद देण्याचा प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्राची जनता आणि विदर्भाने सेनेवर खास प्रेम केलंय. गेल्या काही वर्षांपासून विदर्भात सेनेचे आमदार कमी निवडून आले. त्याला काही कारणं आहे. त्यामुळे आम्ही इथे आलोय, आगामी निवडणूकीच्या दृष्टीने पक्ष वाढविण्याचं काम करतोय असं ते म्हणाले.
भावना गवळी शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानात सामील झाल्या नाहीत, त्याबद्दल राऊत म्हणाले की, भावना गवळी आम्हालाही दिसत नाही, याचा अर्थ त्या शिवसेनेत दिसत नाही असं नाही. त्यांनी रितसर परवानगी घेऊन भावना गवळी आज नाही. त्यांच्यामागे ईडी ने जे काही लावलं त्यामुळे त्यांना कोर्टात जावं लागतंय. महाविकास आघाडीकडे नसलेल्या जागेवर आता आम्ही जास्त लक्ष केंद्रीत करु, विदर्भात २९ भाजपचे आमदार आहेत. कोल्हापूरची जागा अनेक वर्ष सेना लढते आणि जिंकते. सेना-भाजप एकत्र लढली तेव्हा सेनेचा उमेदवार कोल्हापूरवरुन हरले, आता तिथे काँग्रेसचा हक्क आहे. २०२४ विचार करु याबाबत विचार करु असं राऊत म्हणाले.
तपास यंत्रणांचा मी व्हिक्टीम:
केंद्रीय तपास यंत्रणांबाब राऊत म्हणाले की, केंद्रीय तपास यंत्रणांचा खुळखुळा झाला. त्याचं केंद्र महाराष्ट्र आहे, त्याचा व्हिक्टीम मी आहे. माझासारख्या सर्वसामान्य व्यक्तींला इडीने त्रास दिला असा आरोप करत राऊत म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नातेवाईकांना ईडी ने बोलावलं. युपीएच्या काळात १० वर्षांत कमी धाडी आणि भाजपच्या काळात १० हजार धाडी पडल्या तरी, आम्ही अजिबात वाकणार नाही. मोडणे तर सोडा असं म्हणत त्यांना भाजपवर टीका केली.
फडणवीसांची दहशत नाही:
फडणवीसांबाबत बोलताना ते म्हणाले की, दहशत शब्द आमच्या डिश्नरीत नाही. ईडीचे अधिकारी मुंबईत खंडणी गोळा करतात याचे पुरावे देणे हा बॅाम्ब नाही का? विधानसभेत खोटे पुरावे देणे हा बॅाम्ब नाही असं ते म्हणाले. पडळकरांबाबत ते राऊत म्हणाले की, कोणाविषयी बोलायचं, कोणावर बोलायचं हे आम्ही ठरवलं आहे.
भागवतांना जनाब संघाचा प्रमुख म्हणायचं का?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत राऊत म्हणाले की, नागपूरात संघाचं मुख्यालय आहे. आम्ही संघाकडे आदराने पाहतो. मोहन भागवत यांची काही काळातली वक्तव्यं बघीतली तर त्यांना जनाब म्हणणार का? म्हणून मोहन भागवत जनाब संघाचे प्रमुख झाले का? असा सवाल करत ते पुढे म्हणाले की, संघाने मुस्लीम मंच काढलाय. या देशात मुस्लीम राहूच शकत नाही, तर ते हिंदू नाही असं म्हणणाऱ्या मोहन भागवत यांना काय म्हणणार असा सवाल त्यांनी संघाला विचारला आहे.