Published On : Sat, Mar 24th, 2018

मनपाच्या सहा हजार विद्यार्थींनींना सॅनिटरी नॅपकीनचे मोफत वाटप


नागपूर: नागपूर महानगरपालिका आणि रोटरी कल्ब ईशान्य यांच्या संयुक्त विद्यामाने नागपूर महानगरपालिकेच्या शाळेतील सहा हजार विद्यार्थींनींना त्यांच्या सॅनिटरी नॅपकीनचा वर्षभराचा साठा मोफत वाटपाचा कार्यक्रम शनिवारी (ता.२४) ला आसीनगर झोनमधील एम के आझाद शाळेत झाला. शाळेच्या मुख्याधापिका निखत रेहाना यांच्या हस्ते विद्यार्थींनींना सॅनिटरी नॅपकीनचे वाटप करण्यात आले.

यावेळी शाळेच्या मुख्याधापिका निखत रेहाना यांनी सॅनिटरी नॅपकीनचे महत्व काय आहे. हे पटवून दिले. मनपाच्या शाळेतील माध्यामिक आणि उच्च माध्यामिक शाळेतील ५८०० विद्यार्थींनींना प्रत्येकी ९६ सॅनिटरी नॅपकीनचे वाटप करण्यात आले आहे. या अभिनव उपक्रमाची सुरूवात १९ मार्च पासून सुरू झाली. मनपाच्या दहाही झोनमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला. महानगरपालिकेच्या ८४ शाळेंचा सहभाग यात होता.

या उपक्रमाची पूर्वपिठिका रोटरी कल्ब ईशान्यच्या निलू टावरी यांनी विद्यार्थींनींना समजवून सांगितली. मासिक पाळी हा नैसर्गिक क्रिया आहे. त्याबद्दल कोणतिही मनात भिती आणि लाज बाळगू नये. त्याबद्दल काही अडचणी येत असेल तर त्वरित आपल्याला पालकांना त्याबाबत कळवावे, असे त्यांनी सांगितले. या अभिनव उपक्रमाबद्दल महानगरपालिकेच्या शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार यांनी रोटरी कल्ब ईशान्य या संस्थेचे आभार मानले.

Gold Rate
24 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,14,000 /-
Gold 22 KT ₹ 1,06,000 /-
Silver/Kg ₹ 1,35,700/-
Platinum ₹ 49,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कार्यक्रमाला क्रिडा विभागाचे नरेश सवाईथूल, प्रमोद जांवदिया, संजय मोहता, कमल टावरी, नरेश बलदवा, वर्षा जांवदिया, अर्चना मेहता, अनिता टावरी, प्रमिला मेहता हे उपस्थित होते.

Advertisement
Advertisement