Published On : Tue, Nov 5th, 2019

ग्रामीण पत्रकार संघ कन्हान व्दारे सानिका मंगर चा गौरव सन्मान

कन्हान : – ३२ वी विद्या भारती अखिल भारतीय मैदानी स्पर्धा नागौर राजस्थान येथील मैदानी दौड स्पर्धेत कु सानिका मंगरने प्रथम क्रमांक प्राप्त करून दोन सुवर्ण व लांब उडीत रौप्य पदक पटका वित कन्हान चा नावलौकिक केल्या बद्दल ग्रामीण पत्रकार संघ कन्हान व्दारे कु सानिका मंगर चा सत्कार समारंभास गौरव सन्मान करण्यात आला.

नागौर राजस्थान येथे विद्या भारती अखिल भारतीय ३२ वी मैदानी स्पर्धेत संपुर्ण भारतातुन ११ श्रेत्राचे ७५० च्या अधिक खेडाळु सहभागी झाले होते. राष्ट्रीय आंतरशालेय मैदानी स्पर्धेत बी के सी पी शाळा कन्हान ची इयत्ता १० वी ची विद्यार्थी खेडाळु कु.सानिका अनिल मंगर हीने पश्चिम श्रेत्राचे प्रतिनिधीत्व करित १७ वर्ष वयोगट मुलीं मध्ये १००, २०० मी. दौड (धावनी) स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करून दोन सुवर्ण पदक पटकाविले.

तर लांब उडीत रौप्य पदक प्राप्त करित बीकेसीपी शाळेचे, कन्हान शहराचे नावलौकिक केल्याबद्दल ग्रामीण पत्रकार संघ कन्हान व्दारे कु.सानिका मंगरचा ग्रामीण पत्रकार संघाचे मार्गदर्श क एन.एस.मालविये, अध्यक्ष मोतीराम रहाटे, सामाजिक कार्यकर्ता राधेश्याम हटवार, चंद्रशेखर भिमटे यांच्या हस्ते गौरव सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छाने गौरव सन्मान, सत्कार करण्यात आला. तसेच कु सानिकाची आई कुंदा मंगर, वडिल अनिल मंगर, क्रिडा शिक्षक अमित ठाकुर, मुख्याध्यापिका कविता नाथ यांचा सुध्दा पुष्पगुच्छाने गौरव करण्यात आला.

याप्रसंगी मान्यवरांनी शाळेच्या शैक्षणिक प्रगतीसह विद्यार्थ्यांच्या विविध सुप्त गुणाचा विकासाकरिता सुध्दा शाळे चे सर्वोच्च पर्यंत सुरू असल्याने संस्था अध्यक्ष राजीव खंडेलवाल,सचिव गेरोला मॅडम यांचे सुध्दा अभिनंदन करून कन्हान नदीच्या नविन पुलनिर्माण व महामार्ग रस्ता निर्माधिन कामात शाळेचे क्रिडा मैदान गेल्याने पुरेसे क्रिडा मैदान नसल्याची खंत व्यकत करण्यात आली. कु सानिका मंगर, आई कुंदा मंगर,वडिल अनिल मंगर, क्रिडाशिक्षक अमित ठाकुर मुख्याध्यापिका कविता नाथ, सर्वशिक्षक यांच्या प्रयत्नाचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

या प्रसंगी ग्रामीण पत्रकार संघ कन्हान चे उपाध्यक्ष सुनिल सरोदे, कमलसिंग यादव, सचिव रमेश गोळघाटे, शांताराम जळते, रविंद्र दुपारे, रोहित मानवटकर, सामाजिक कार्यकर्ता विजय पारधी, मुकेश कांबळे, प्रेमचंद राठोड, आशिष राठी सह उत्कर्ष रहाटे, विनय राठोड आदी मोठया संख्येने शाळेचे विद्यार्थी खेडाळुच्या उपस्थित कु सानिका मंगर चा भव्य गौरव सन्मान, सत्कार करण्यात आला.