Published On : Wed, Jan 3rd, 2018

संघाने भीमा कोरेगाव हिंसाचाराचा केला निषेध

Manmohan Vaidya
नागपूर: भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसेचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने निषेध केला आहे. या हिंसाचाराला जबाबदार असलेल्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी संघाने केली आहे.

संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख डॉ. मनमोहन वैद्य यांनी पत्रक जारी करून संघाची भूमिका स्पष्ट केली आहे. कोरेगाव हिंसाचार हा निषेधार्ह आणि दुःखद आहे. या घटनेचा आम्ही निषेध करतो. जे यात दोषी आढळतील त्यांना कायद्यानुसार शिक्षा झाली पाहिजे. समाजात तेढ निर्माण करण्याचा काही छुप्या शक्ती प्रयत्न करत आहेत. अशा समाजकंटकांच्या जाळ्यात लोकांनी अडकू नये. नागरिकांनी समाजात शांतता व एकता कायम ठेवावी, असे आवाहन संघातर्फे डॉ. वैद्य यांनी केले .

Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement