Published On : Thu, Nov 26th, 2020

संदीप जोशी-नितीन धांडे यांना विजयी करा : ना. गडकरी

Advertisement

पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक
पूर्व व पश्चिम विदर्भातील भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद

नागपूर: नागपूर पदवीधर मतदारसंघ आणि अमरावतीतील शिक्षक मतदारसंघ या दोन्ही निवडणुकी प्रतिष्ठेच्या करून कार्यकर्त्यांनी गांभीर्याने घ्याव्यात. मतदान संदीप जोशी आणि नितीन धांडे यांना व्हावे यासाठी संपर्क वाढवा व दोन्ही उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातील भाजपा कार्यकर्त्यांनी ना. गडकरी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. याप्रसंगी पदवीधर मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे व उमेदवार संदीप जोशी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना ना. गडकरी म्हणाले- गेल्या 58 वर्षापासून पदवीधर हा मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला आहे. भाजपाच्या विचाराचा पगडा राहिला आहे. संदीप जोशी यांनी महापौर म्हणून, स्थायी समिती अध्यक्ष व नगरसेवक म्हणून उत्कृष्ट कार्य केले आहे. खासदार क्रीडा महोत्सवाचे यशस्वी आयोजन केले आहे. संघटन कौशल्य त्यांच्याकडे आहे.

कार्यकर्ता म्हणून काम करण्याची क्षमता त्यांच्यात आहे. आपला आवाज ते विधान परिषदेत बुलंद करतील. भाजपला हरविण्यासाठी सर्व जण एकत्र आले आहेत. त्यांच्यावर मात करून ही निवडणूक आपल्याला जिंकायची आहे. यासाठी प्रत्येकाने संपर्क वाढवा व संदीप जोशी व नितीन धांडे यंना मतदान अधिक होईल यासाठी प्रयत्न करा, असे आवाहनही ना. गडकरी यांनी यावेळी केले.

Advertisement

विधान परिषदेत आपल्या आमदारांची संख्या वाढविणे आवश्यक आहे. केंद्र शासनाने आणलेल्या नवीन शैक्षणिक धोरणाचे चांगले परिणाम आता दिसू लागले आहेत. शिक्षण क्षेत्रात परिवर्तन हवे हे कृतीवरून आपण सिध्द करून दाखविले आहे. शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण व्हावे व ज्ञानविज्ञान वाढावे. यासाठी नेतृत्व चांगले असले पाहिजे. या दृष्टीने अमरावती शिक्षक मतदारसंघात नितीन धांडे हे उमेदवार आहे. त्यांना विजयी करण्याचे आवाहनही ना. गडकरी यांनी केले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.