Published On : Sat, Aug 31st, 2019

ग्रामसेवक संघटनेचा संप तात्काळ मिटविण्याच्या मागणीसाठी सरपंच संघटनेचे सामूहिक निवेदन

Advertisement

कामठी :- राज्यातील ग्रामसेवकांनी सुरवातीला स्थानिक पातळीवरुन आंदोलन करीत २२ आॅगस्ट पासुन कुलूपबंद बेमुदत कांम बंद आंदोलन सुरू केले आहे, त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायतींचे कामकाज विकास कामे ठप्प पडले असून ग्राम विकासावर विपरीत परिणाम झाला आहे व विकास कामे रखडली आहे, निधी खर्च झाला नाही तर तो निधी परत जाण्याची शंका नाकारता येत नाही..

ग्रामसेवकांच्या मागण्या संदर्भात समस्त सरपंचाची सहानुभूती आहे, पण या आंदोलनामुळे ग्रामविकास व गावातील नागरिक एक प्रकारे भरडल्या जात आहेत. तसेच सरपंच यांना गावकर्‍यां सोबतच राहून विकास कामे वेळेवर पूर्ण करायची असते, त्यामुळे राज्यातील ग्रामसेवक युनियन चा सुरू असलेला बेमुद्दत संप तात्काळ मिटविण्यात यावा , ग्रामसेवकांच्या समान काम व समान पगार, वेतन श्रेणी प्रमाणे पदोन्नती, मोठ्या ग्रामपंचायती मध्ये जास्त कर्मचारी अतिरिक्त कामे कमी करणे अशा रास्त मागण्या मंजुर करण्यात याव्या, गावाचा कारभार चालविण्यासाठी ग्रामसेवक आमचे सहकारी आहेत, त्यांच्या कामबंद आंदोलन संप मिटविण्या साठी शासनाने पुढाकार घेऊन संप लवकर मिटविण्यात यावा या आशयाचे मागणीचे निवेदन नागपूर जिल्हा सरपंच संघाच्या वतीने जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव व उपमुख्य कार्यकारी अधिकारी भुयार यांना देण्यात आले

हे निवेदन सादर करताना सरपंच सेवा महासंघाच्या नागपुर जील्हाध्यक्षा व कढोली ग्रा प चे सरपंच प्रांजलताई वाघ , जील्हासरचीटनीस , मनीष फुके,प्रविण दहेकार,संजय कामडी,मनीष फुके,नरेश गोर,राजू चौधरी,निलेश शेठे,गणेश नाकाडे, रुपेश मुंदाफळे,सुधाकर घाघरे,रितेश पर्बतकर व जिल्ह्यातील सरपंच , उपसरपंच मोठ्या संख्येत उपस्थित होते.

संदीप कांबळे कामठी