हिंगणा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे.यातच महा विकास आघाडी सरकार असताना भाजप आमदारांना निधी न देण्याचे धोरण ठरविले होते. परिणामी विकास कामांना खिळ बसली होती.अडीच वर्षांनंतर महायुतीचे सरकार आल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भरघोस निधी विकास कामांसाठी मिळाला. शहरी व ग्रामीण भागाचा समतोल विकास साधण्याचा प्रयत्न केला. विकास कामांची शिदोरी घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची माहिती भाजप आमदार समीर मेघे यांनी पत्रपरिषदेत दिली.
समीर मेघे यांनी लावला विकासकामांचा धडाका-
-जिल्हा नियोजन समितीकडून १० कोटी निधी उपलब्ध झाला.
-२०२४ वर्षात एकाच वेळेस २८० कोटींचा राज्यस्तरातून निधी उपलब्ध.
-वानाडोंगरी पाणीपुरवठा १४१ कोटी तर बुट्टीबोरी योजनेसाठी १०५ कोटींचा निधी मंजूर. • बुट्टीबोरी म्हाडा कॉलनीतील मुलभूत सुविधांसाठी ६ कोटींचा निधी मंजूर.
-बुट्टीबोरीत २ कोटी ५० लाख तर तर हिंगणा बसस्थानकासाठी ५ कोटी रूपयांचा निधी मंजूर.
– ७५ पांदण रस्त्याच्या निर्मितीसाठी १० कोटी ५० लाखांचा निधीतून ६० टक्के कामे पूर्ण.
– वानाडोंगरी, वाडी, बुट्टीबोरी, डिगडोह न.प. व निलडोह, गोधनी व हिंगणा नगरपंचायतची निर्मिती. -२०२२ते २०२४ मध्ये नागरी सुविधा बळकटीकरणासाठी राज्यस्तरावरून ४० कोटीचा निधी
-निलडोह, डिगडोह, इसासनी, टाकळघाट, सातगाव व कान्होलीबारा गावांसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना.
दरम्यान हिंगणा तालुक्यात जलजीवन मिशन योजनेची कामे अद्यापही रखडली आहेत. ही योजना जि.प. अंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा विभाग राबवित आहे. एकाच कंत्राटदाराला क्षमता नसतांना दहा ते पंधरा गावाचे काम दिल्या गेले. याला जि.प. यंत्रणा जबाबदार आहे. जि.प.अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती व माजी सभापती यांनी विकास कामात केवळ अडथळा आणण्याचा प्रकार सुरू केला आहे. जलजीवन मिशन योजनेची कामे रखडल्याची जबाबदारी जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्यांनी घेण्याची हिंमत दाखवावी, असा टोला विरोधकांना आमदार समीर मेघे यांनी लगावला.