Published On : Mon, Nov 21st, 2022
By Nagpur Today Nagpur News

आतापर्यंत सुमारे ३२००० महा कार्डची विक्री

महा कार्ड द्वारे डिजिटल पेमेंटला चालना

नागपूर: महा मेट्रोने नेहमीच तिकीट खरेदी करण्यासाठी डिजिटल माध्यमांचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले असून याकरता मोबाइल ऍप आणि महा कार्ड सह अनेक पर्याय प्रवाश्यांना उपलब्ध करून दिले आहेत. याच प्रयत्नांची पावती म्हणजे नागपूरकरांनी महा कार्डची मोठ्या प्रमाणात केलेली खरेदी. साहजिकच मेट्रोने प्रवास करताना डिजिटल पेमेंट देखील मोठ्या प्रमाणात होत आहे.आतापर्यंत एकूण ३१८८६ महा कार्डांची विक्री झाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) सहकार्याने या कार्डचे संचालन करण्यात येत आहे.

Gold Rate
24 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,14,000 /-
Gold 22 KT ₹ 1,06,000 /-
Silver/Kg ₹ 1,35,700/-
Platinum ₹ 49,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सरासरी दर महिन्याला १८०० महा कार्डांची विक्री होते,प्रवाश्यांचा प्रवास सुखकर व्हावा याकरता महा मेट्रोने EMV (युरो मास्टर व्हिसा) स्मार्ट कार्ड आधारित ओपन लूप ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन (एएफसी) प्रणाली स्वीकारली आहे आणि ही नागपुरातील सर्व मेट्रो स्थानकांवर लागू करण्यात आली आहे.

या प्रणालीच्या माध्यामाने प्रवाश्यांना ट्रेनमध्ये चढताना आणि उतरताना मेट्रो स्टेशनवरील ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन (एएफसी) गेट्सवर फक्त त्यांचे कार्ड टॅप करावे लागते आणि त्या माध्यमाने प्रवासी भाडे कार्डमधून कापल्या जाते. महत्वाचे म्हणजे कार्डच्या माध्यमाने मेट्रोने प्रवास केल्यास प्रवाश्यांना तिकीट दरावर १० % सुट देखील मिळते. महा कार्ड मेट्रो स्थानकांवर खरेदी करता येते.

महा कार्ड आणि अत्याधुनिक एएफसी प्रणाली पूर्णपणे सुरक्षित आणि पारदर्शक असून जेवढा प्रवास केला असेल तेवढेच भाडे कार्ड मधून वजा केल्या जाते तसेच याप्रकारे कुठल्याही प्रकारची फसवणूक होत नाही. ईएमव्ही मानक आधारित स्मार्ट कार्ड ओरिएंटेड ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन सिस्टीम (AFC) हे प्रवास भाडे भरण्यासाठी उत्तम उपाय आहे.

महाकार्डची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे :
• मेट्रो स्थानकांवर महा कार्डची खरेदी तसेच टॉप करते येते.
• अत्यंत सुरक्षित चिप आधारित ड्युअल इंटरफेस (संपर्क आणि संपर्करहित) स्मार्ट कार्ड.
• स्वाईप करण्याच्या पद्धतीचा अवलंब
• इंटरनेट आणि मोबाइल आधारित व्यवहारांसाठी सुसंगत
• (Europay, Master, Visa, Rupay) प्लॅटफॉर्मवर स्वीकृत वैयक्तिक कार्ड.

महा कार्ड आणि एएफसी प्रणालीमुळे मेट्रोने प्रवास करणे सोपे आणि स्वस्त तर झाले आहेच पण या सोबतच कार्डचा वापार केल्याने तिकीट घेण्याची गरज नसल्याने मेट्रो ट्रेन राईड सुखकर देखील केली आहे

Advertisement
Advertisement