Published On : Thu, Aug 9th, 2018

श्रीदेवीसाठी मुख्यमंत्र्यांनी पहाटे 5 ला ट्‌वीट केले, पण 23 मराठ्यांसाठी त्यांना वेळ नाही!

Advertisement

कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी आत्तापर्यंत 23 आत्महत्त्या झाल्या आहेत. मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ना श्रध्दांजली वाहिली, ना दु:ख व्यक्‍त केले. यावरुन मराठा समाजाबददलच्या त्यांच्या भावना स्पष्ट होतात. म्हणूनच त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी कोल्हापूर येथील सकल मराठा समाजाने पत्रकार परिषदेत केली.

आरक्षण देण्याची घोषणा करुनही शासनाने हा प्रश्‍न मार्गी लावलेला नाही. त्यामुळे संपूर्ण समाजात अस्वस्थता पसरली आहे. त्यातूनच राज्यातील 23 मराठा बांधवांनी आत्महत्त्या केल्या आहेत.

Advertisement
Advertisement

अभिनेत्री श्रीदेवी वारल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटे पाच वाजता ट्‌टीवट करुन दु:ख व्यक्‍त केले. मात्र आज राज्यातील 23 मराठा बांधवांनी आत्महत्त्या करुनही मुख्यमंत्र्यांना जाग आलेले नाही.

ते अत्यंत असंवेदनशिल मुख्यमंत्री आहेत. या 23 लोकांच्या मृत्यूची जबाबदारी त्यांच्याच खांद्यावर आहे. ते आणखी थोडा काळ मुख्यमंत्री राहिले तर आणखी आत्महत्त्या वाढतील. म्हणूनच त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement