Published On : Wed, Jun 25th, 2025
By Nagpur Today Nagpur News

व्याघ्र प्रकल्पांमध्ये सफारीला ब्रेक;पावसाळ्यामुळे १ जुलैपासून जंगल सफारीस स्थगिती

Advertisement

xr:d:DAFyPXockfA:24,j:9023368957319006120,t:23102510

नागपूर :पावसाळ्याच्या हंगामात वन्यप्राण्यांचा प्रजनन काल लक्षात घेता व त्यांच्या हालचालींना अडथळा होऊ नये म्हणून, राज्यातील काही व्याघ्र प्रकल्पांमधील जंगल सफारी सेवा पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्याकडून देण्यात आलेल्या निर्देशांनुसार, पेंच व्याघ्र प्रकल्पाचे कोअर क्षेत्र, बोर व्याघ्र प्रकल्प, तसेच उमरेड-पवनी-क-हांडला अभयारण्य येथील जंगल सफारी सुविधा १ जुलै २०२५ पासून पुढील आदेश येईपर्यंत पर्यटकांसाठी स्थगित करण्यात आली आहे.

सदर निर्णय वन्यजीवांच्या संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जात आहे. यामुळे वन्यप्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात कोणतीही व्यत्यय न आणता प्रजनन प्रक्रियेची पूर्तता करता येईल, असा विश्वास वनविभागाने व्यक्त केला आहे.

तथापि, पर्यटकांना निसर्ग अनुभवायची संधी कायम ठेवत पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील पवनी (एकसंघ नियंत्रण) पर्यटन गेट आणि सुरेवानी पर्यटन गेट येथून मर्यादित स्वरूपात जंगल सफारीची सुविधा ऑफलाइन पद्धतीने उपलब्ध राहणार आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.