Published On : Sat, Apr 4th, 2020

कामठीत जमित ए उलमी सामाजिक संघटनेच्या वतीने 650 गरीब कामगार कुटूंबांना तांदूळ गहू, व जिनावश्यक वस्तूचे वाटप करून सामाजिक बाधिलकी जोपासली

Advertisement

कामठी :-, कोरोणा सारख्या महाभयंकर रोगामुळे सर्वत्र कर्फ्फु, जमाबंदी ,संचारबंदी असल्यामुळे नागरिकांना घराबाहेर निघणे कठीण झाल्यामुळे गेल्या आठ दिवसापासून गरीब कामगार वर्गाच्या कुटुंबातील अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू संपल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली असता जमित ए उलमी सामाजिक संघटनेच्या वतीने कामठी शहरातील विविध परिसरातील 650 गरीब कामगार कुटुंबातील नागरिकांना तांदूळ गहू व इतर जीवनावश्यक वस्तूचे पॉकेट वितरित करून सामाजिक सामाजिक बांधिलकी जोपासली

कोरोना सारख्या महाभयंकर रोगामुळे प्रशासनाचे वतीने गेल्या 24 मार्च पासून शहरात कर्फु जमाबंदी संचारबंदी लागू केल्यामुळे नागरिकांना घराबाहेर निघणे कठीण झाले आहेत अशा परिस्थितीत गरीब कामगार वर्गाच्या घरातील गेल्या आठ दिवसापासून अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तू संपल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली असता अशा परिस्थिती जमित ए उलमी सामाजिक संस्था कामठी चे अध्यक्ष मौलाना मुमताज कासमी सहाब, सचिव मोम्मद मुख्तार सहाब व सहकार्यानी मिळून भाजीमडी, कादर झेंडा, इस्माईलपुरा, वारीसपुरा, कामगारनगर, सईलाब नगर, नवीन कामठी परिसरातील 650 गरीब कामगार कुटूंबाना 5 किलो तांदूळ, 5 किलो गहू, व इतर जीवनावश्यक वसुचे पॉकेट वितरित करून सामाजिक बांधिलकी जोपासली व संचार बंदी काळात नागरिकांनी घराबाहेर न पडता प्रशासनाला सहकार्य करण्याची विनंती केली

संदीप कांबळे कामठी