Published On : Mon, Feb 17th, 2020

ग्रामीण भागासह शहरी भागातील प्रश्न सोडवले पाहिजेत ;प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अर्बन सेलच्या कार्यकर्त्यांना सूचना

Advertisement

मुंबई– राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्बन सेलच्या वतीने ग्रामीण भागातील प्रश्नाबरोबर शहरी भागातील प्रश्न सोडण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काम केले पाहिजे अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी प्रदेश कार्यालयात झालेल्या बैठकीत दिल्या.

अर्बन सेलच्यावतीने पर्यावरणातील प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना आणि महिला सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम राज्यात जिल्ह्यात घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

याप्रसंगी अर्बन सेलच्या अध्यक्षा खासदार वंदना चव्हाण यांनी देखील प्रमुख मुद्द्यांवर लक्ष वेधले. महिलांना रेल्वे स्टेशन परिसरात सॅनिटरी नॅपकिन व्हेण्डिंग मशिन बसविण्यात आल्या पाहिजे. शहरातील ऐतिहासिक स्थळांचा विकास करून पर्यटन स्थळ निर्माण करणे व तेथील स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध करणे अशा विविध मागण्या त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे केल्या.

या बैठकीस माजी खासदार आनंद परांजपे, आमदार विद्या चव्हाण तसेच अर्बन सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.