Published On : Mon, Sep 20th, 2021

ग्रामीण कृषी कार्यानुभव कारेक्रम 2021

नागपूर: ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम २०२१ अंतर्गत मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालय यवतमाळ येथील विद्यार्थिनी कु . चेतना गजानन कडू हिने काटोल मधील कृषी उत्पन्न बाजार समिती ला नुकतीच भेट दिली .

या भेट दरम्यान कापूस , तूर , हरभरा , सोयाबीन तसेच फल्ली व अनेक अश्या शेतमालाला योग्य भाव मिळून देण्याबाबत आणि शेतमालाचा होणारा लिलाव त्याची पद्धत व धान्य कोठार संबंधित उत्पादित शेतमालास योग्य भाव मिळे पर्यंत कृषी बाजार समितीच्या कोठारात मालाची कश्या प्रकारे साठवण करून करून ठेवला जातो त्या पावतीवर बँकेच्या माध्यमातून कर्ज सोय उपलब्ध करून देण्याबाबतची सविस्तर माहिती तिने श्री . काळमेघ तसेच कर्मचारी श्री . रिधोरकर यांच्या कडून घेतली .

तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे वार्षिक फायदे व तोटे काय व किती तसेच गुरांचा बाजार हा कश्याप्रकारे भरतो या विषयक माहिती त्यांनी दिली.तसेच हा उपक्रम डॉ. आर. ए . ठाकरे सर (प्राचार्य) एम व्हि कडू सर (उपप्राचार्य) ग्रामीण कृषी कार्यानुभव अधिकारी प्राध्यापक शुभम सरप सर व प्राध्यापक सौरभ महानुर सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला .