Published On : Tue, May 12th, 2020

“इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड ड्रॉईंग रुममध्ये 85 k.m. धावणे” – डॉ . राजेंद्र जयस्वाल 

Advertisement

आजची जगातील परिस्थिती बघता कोरोना (कोविड – 19) या विषाणूने सर्वांना ग्रासले आहे. आज सर्वजण लॉकडाऊन मध्ये आहेत. सर्वांना आपल्या भविष्याची हूरहूर, लॉकडाऊन मूक्त केव्हा होऊ या चिंतेने ग्रासलेले आहे. सर्वांचे लक्ष आता बाहेर पडण्यासाठी लागलेले आहे. बऱ्याच लोकाच्या मनात नकारात्मक भावना उत्पन्न झालेल्या आहेत. तरिसुध्दा या काळात आपल्या नागपूरातील डॉ. राजेंद्र जयस्वाल यांनी या परिस्थितीवर मात करुन मनात कुठलिही नकारात्मकता न येऊ देता, जे कोरोना वॅरियर्स आहेत. डॉक्टर, परिचारिका, स्वच्छता कर्मचारी, पोलिस कर्मचारी, मिडिया यांच्या समर्थनार्थ त्यांनी घरीच राहून ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ निळवला आहे. 

कोरोना वारियर्सला पाठिंबा देण्यासाठी डॉ. राजेंद्र जयस्वाल यांनी नविन विक्रम केला आहे. या कोरोना वॉरियर्स ज्यात डॉक्सार, परिचारिका, स्वच्छता कर्मचारी, पोलीस कर्मचारी, मीडिया आणि इतर अनेक आवश्यक सेवा आणि पुरवठा सांभाळण्यात गुंतले आहे, कोविड – 19 चा प्रसार रोकण्याच्या प्रयत्नात स्थिरपणे योगदान देत आहेत, त्यांच्यासाठी 2 मे 2020 रोजी आघाडीच्या कामगारांना कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी डॉ . राजेंद्र जयस्वाल जे फिटनेस उत्साही, अत्यंत अभिजात ऍथलिट आणि मध्य भारतातील प्रख्यात आयर्नमॅन यांनी स्वतःच्या होम ड्रॉईंग रुममध्ये 85 km धावून ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ तयार केले.

Gold Rate
15 May 2025
Gold 24 KT 92,100/-
Gold 22 KT 85,700/-
Silver/Kg 94,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

“फेसबुक लाईव्ह” द्वारे हे संपूर्ण जगाने पाहिले. 12 तास 58 मिनिट 14 सेकंड हा त्यांचा रेकॉर्डचा कालावधी नोंदवण्यात आला होता. पहाटे 5.45 a.m. ते 6.40 p.m. या वेळेत त्यांनी आपल्या “कोरोना योध्दा” – वैद्यकिय व्यवसायातील, आरोग्य कर्मचारी, पोलिस कर्मचारी, सरकारी कर्मचारी आणि प्रतिबध्द प्रयन्नांबददल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतुने धावण्यास सुरुवात केली. 

कोविड – 19 साठी भूगर्भात, हवेत आणि समुद्रावर कित्येक उपक्रमांच्या माध्यमातून डॉ . राजेंद्र जयस्वाल यांनी लॉकडाऊन कालावधीत घरातून फिटनेस विषयी जागरुकता वाढविण्यासाठी हे विक्रम समर्पित केले ज्यामुळे कोविड – 19 चा प्रसार कमी होण्यास हातभार लावता येईल. सामाजिक अंतराच्या निकषानुसार घरी राहून, निरोगी राहण्यासाठी मन आणि भावनिक सुदृढ राहण्याकरिता शरिराची हालचाल आणि घाम गाळण्याचा प्रयत्न करुन आपली मनःस्थिती सुधारु शकतो. उदासिनता कमी करुन संज्ञानात्मक क्षमताना मदत करते ज्यामुळे एंडार्फिन आणि डोपामाईनचे गर्दी होते तेव्हा आपण मानसिक आणि भावनिकदृष्या तंदुरुस्त राहु शकतो. 

डॉ. राजेंद्र जयस्वाल यांच्या म्हणण्यानुसार जर ते घरी राहुन 85 K.M. धावू शकत असेल तर आपल्यापैकी प्रत्येकजन स्वतःच्या घरी किमान 5 K.m. चालून किंवा धावून निरोगी राहू शकतो.

रोटरी क्लब ऑफ नागपूर , ज्युनिअर चेंबर्स इंटरनॅशनल यांच्या सारख्या एन. जी. ओ. (NGO) तसेच विविध सामाजिक संस्थेमध्ये ते सक्रिय सदस्य आहेत. म्हणूनच विक्रम संपल्यानंतर बऱ्याच लोकांनी त्यांच्याशी संपर्क साधून, अंतर्गत व्यायाम सुरु केले आणि त्यांना मदत करण्यास पूढे आले आहेत. 

कोरोना वॉरियर्सला मदत करण्यासाठी त्यांचे समर्थन व संरक्षण करण्यासाठी 100 पीपीई किटस देण्याची व्यवस्था केली आहे. 
डॉ. राजेंद्र जयस्वाल डे मध्य भारताचे एकमेव हंड्रेड मिलर धावपटू आहेत आणि त्यांना २६ जने. २०१९ रोजी “Asia Book Of Records” बनवून विक्रम केला आहे. १२.५ तास, हातामध्ये तिरंगा घेऊन नॉन स्टॉप धावण्याचा विक्रम केला आहे. ते दररोज सकाळी ५.३० ते ७.०० पर्यंत शारीरिक प्रशिक्षण घेतात आणि त्यानंतर ९.०० पर्यंत योग करतात. 

या “इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड” चे श्रेय ते त्यांची पत्नी विनिता, मुले माहिन आणि रित्विक, श्री समीर जयस्वाल, मार्गदर्शक डॉ अमित समर्थ, कु सुनीता वाधवान, डॉ सुनीता धोटे, वैभव अंधारे, Miles & MIlers, Orange City Runners चे आशिष अग्रवाल यांनी त्यांना सहकार्य केले आहे . 

डॉ राजेंद्र जयस्वाल – ९४२२८०४४४८
ऍड भुमीता सावरकर – ९०२८११८२११

Advertisement
Advertisement
Advertisement