रामटेक -.नागपूर जबलपूर रोड स्थित ग्रा. पं.कांद्री(खदान) तालुका रामटेक अंतर्गत येणाऱ्या आरटीओ चेक पोस्ट येथे वाहन चालकांकडून अवैध वसुली केली जात असल्याची चर्चा सध्या जोरात चालू आहे.
या महामार्गावरील कुरई घाटाच्या रुंदीकरणाचे काम चालू असुन ह्या रोडवरील वाहतूक दोन महिण्याकरिता बंद आहे.सदर वाहतूक सावनेर ते छिंदवडा मार्गे वळविली आहे. असे असताना सुद्धा चेक पोस्ट वरील सदभाव कंपनी तसेच आर टी ओ अधिकारी हे साठगाठ करून वाहनचालकांकडून अवैधपणे पैसा उकळत आहेत. आरटीओ अधिकाऱ्यांनी पैसा वसुली करण्याकरिता काही खाजगी व्यक्तीमार्फत जोरदार वसुली सुरू केली आहे.
चेक पोस्ट हे पैसा वसुलीचे माहेरघर बनलेले आहे की काय अशी चर्चा संपूर्ण परिसरात सुरू आहे. येथे दमदाटी, गुंडागर्दी करण्याकरिता गुंड प्रवूत्तीच्या लोकांना हाताशी धरुन ठेवले आहे.आरटीओ अधिकाऱ्यांनी पैसा वसुलीसाठी योगेश तसेच थापा व्यक्तिमार्फत जोरदार वसुली सुरू आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग परिसरात होवु नये म्हणून ग्रामपंचायत मार्फत योग्य ती खबरदारी घेतली जात आहे परंतु येथील पैसा वसुली व निष्काळजीपणामुळे संसर्ग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ग्रामपंचायत कांद्री खदान कडुन परिवहन अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व पोलिस निरीक्षक रामटेक याना अवैध वसूली बंद करण्याबाबत निवेदन देन्यात आलेली आहे.
सरपंच परमानंद शेंडे यांचे मत,”गेल्या काही दिवसांपासून आरटीओ चेक पोस्टवर ट्रक चालकाकडून अवैध वसुली चालू असल्याची माहिती मिळताच चेक पोस्टवरील प्रकाराची माहिती महसूल व पोलीस प्रशासनाला दिली.
कोरोनापासून बचावासाठी ग्रामपंचायत प्रशासन सर्वस्तरावर कार्यरत असून अशा प्रकारातून कोरोनाचा शिरकाव झाला तर धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते.”
