Published On : Thu, Aug 31st, 2017

प्रथमच `आरएसएस’च्या नोंदणीसाठी अर्ज!, कार्यकारिणीत मुस्लिम प्रतिनिधीला स्थान

Advertisement

नागपूर : संविधानाच्या मूळ तत्वाला धरून नागपुरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत `राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ नावाच्या संस्थेच्या नोंदणीसाठी धर्मादाय उपायुक्तांकडे `ऑनलाईन’ आणि `मॅन्युअली’ अर्ज सादर केला आहे. त्यामुळे प्रथमच `आरएसएस’ या नावाने नोंदणीकृत होणारी ही संस्था देशात एकमेव ‘रणार असल्याचा या कार्यकत्र्यांचा दावा आहे.
 
यापूर्वी माहितीच्या अधिकारात `आरएसएस’ नावाच्या संस्थेची नोंदणीबाबत धर्मदाय उपायुक्तांकडे माहिती मागण्यात आली होती. त्यावर या नावाने कुठलीही संस्था नोंदणीकृत नसल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यानी दिली आहे. त्यामुळे एकत्र आलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी नागपूर येथील सिव्हील लाईनस्थित धर्मादाय कार्यालयात सोमवारी ऑनलाईन पद्धतीने आणि कागदोपत्रानिशी अर्ज (अर्ज क्र. ६१५/१७) करून नोंदणी करण्याची मागणी केली. धर्मादाय विभागाने या संस्थेच्या नोंदणीच्या अर्जावर ८ सप्टेंबर रोजीची सुनावणी आयोजित केली आहे. तशा सूचना संस्थेच्या कार्यकारी मंडळाला देण्यात आल्या आहेत.  

या संस्थेच्या कार्यकारी मंडळात बहुजन समाजातील व्यक्तींचा समावेश असून मुस्लिम समाजाच्या व्यक्तीलाही प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. या संस्थेची नोंदणी करताना `देशहित व मानव कल्याण’ हा मूळ उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. कोणत्याही स्वरूपाच्या भेदभावाला, अनिष्ठ प्रथा, परंपरा व अंधश्रद्धा आदींना थारा न देता त्याविरुद्ध प्रचार – प्रसारासह जनजागृतीचे काम करण्याचा संस्थेचा मानस आहे. 

माहितीच्या अधिकारात प्राप्त माहितीवरून धर्मादाय आयुक्तालयात या नावाने संस्था नोंदणीकृत नसल्याने, तसेच समाजाकरिता कल्याणकारी कामे करण्यासाठी संस्थेची स्थापना करण्याचा धडपड्या सामाजिक कार्यकर्त्यांनी निर्णय घेतल्याचे बोलले जाते. तसा त्यांनी बैठकीत एकमताने ठराव पारित केला आहे, असे अर्जदार व सामाजिक कार्यकर्ते जनार्दन मून यांनी सांगितले. त्यांचे अनेक दिवसांपासून या संस्थेवर कार्य सुरू आहे.

या संस्थेच्या घटनेत देश एकसंघ राहावा, प्रत्येक नागरिकांची सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी कार्यातून त्यांचा समग्र दृष्टीने विकास करण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. संस्थेच्या नोंदणीनंतर कार्यकारी मंडळाची दर पाच वर्षांनी निवडणूक घेण्याचीही तरतूद  करण्यात आली आहे. लोकशाही पद्धतीने होणाNया या निवडणुकीत मुस्लिम प्रतिनिधीलासुद्धा या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अध्यक्ष होता येईल. हे विशेष.

याप्रकरणी ८ सप्टेंबरला सिव्हील लाईन स्थित धर्मादाय विभागात सुनावणी होणार आहे. यादरम्यान कुणाचे काही म्हणणे किवा आक्षेप असल्यास तेदेखील नोंदविले जाणार असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे सर्व कार्यकारी मंडळासह संस्थेच्या सदस्यांचे आणि समर्थकांचे सुनावणीकडे लक्ष लागले आहे. 

`सर्वप्रथम भारतीय व शेवटीही भारतीय’ ही संकल्पना प्रत्येक नागरिकांच्यात मनात रुजविण्याचा प्रयत्न ही संस्था करणार आहे. मात्र समाजसेवेचे कार्य करीत असताना संस्था कायदेशीरीत्या नोंदणीकृत असावी, याकरिता धर्मादाय विभागात अर्ज केला.