Published On : Wed, May 30th, 2018

मुंबईत संघाची ४ जूनला इफ्तार पार्टी

Advertisement

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणित मुस्लीम राष्ट्रीय मंचातर्फे रमजाननिमित्त मुंबईत पहिल्यांदाच ४ जून रोजी इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे. ही इफ्तार पार्टी सह्याद्री अतिथीगृहावर होणार असून, मुस्लीम राष्ट्रांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांसह मुस्लीम समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींना निमंत्रित करण्यात आलं आहे.

‘३० देशांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांसह मुस्लीम समाजातील २०० प्रतिष्ठित व्यक्तींना या पार्टीचं निमंत्रण पाठवलं आहे. याशिवाय इतर समाजातील १०० व्यक्ती या पार्टीत सहभागी होतील अशी अपेक्षा आहे,’ असं मुस्लीम राष्ट्रीय मंचाचे राष्ट्रीय संयोजक विराग पचपोरे यांनी सांगितलं.

अल्पसंख्याक समाजात संघाविषयी पसरवण्यात आलेले गैरसमज दूर करणे हा या इफ्तार पार्टीच्या आयोजनाचा मुख्य उद्देश आहे. संघ कोणत्याही समाजाविरोधात नाही. देशातील सर्व समाजांतील नागरिकांमध्ये शांतता, सद्भावना जागृत करायची आहे, असे पचपोरे म्हणाले.