मॉब लिंचिगशी संघाचा संबंध नाही – मोहन भागवत

Advertisement

विजयदशमीच्या निमित्ताने आज, मंगळवारी नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) चा दसरा विजय उत्सव हा कार्यक्रम होत आहे. यावेळी आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारतात मॉब लिचिंत होत नसल्याचे म्हटले आहे. नागपूरमधील आरएसएसच्या दसरा विजय उत्सवासह मुंबईत शिवसेनेचा दसरा मेळावा आणि बीडमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत मेळावा होणार आहे.

संघ कुठलीही गोष्ट छुपेपणानं करत नाही. भारत हे हिंदू राष्ट्रच आहे हे आम्ही जाहीर सांगत आलो आहोत. एका देशात दोन संविधानं नको, ही संघाची भूमिका आहे. गरज असेल तेव्हा कठोर निर्णय घेतले पाहिजे. हिंदूंची संघटना बांधणं म्हणजे मुस्लिमांचा विरोध असं होत नाही.

संघाच्या बदनामीचे प्रयत्न सुरू आहेत. इम्रान खानही ते शिकला आहे. देशातील शिक्षणाचा स्तर सुधारला गेला पाहिजे. उदारता ही आमची परंपरा, आपल्याला काही आव्हानांचा सामना करावा लागेल. मॉब लिंचिंगच्या घटना बाहेरच्या देशात घडतात, आपल्या देशात नाही. एका बाईला सर्वजण दगड घेऊन मारायला आले, तेव्हा येशू ख्रिस्त तिथे येऊन कुणी पाप केले नसेल त्यानेच या बाईला मारावे असे म्हटले होते. आमच्याकडे क्लिचिंगच्या घटना कधीच घडल्या नाहीत. लिंचिंग हा शब्द बाहेरून आला आहे. आमच्याकडे लिंचिंग कधीच नव्हते, असे भागवत यावेळी म्हणाले.

पुढे ते म्हणाले की,
अनेक घटनांमुळे आपण हे वर्ष आठवणीत ठेवू. २०१९ मध्ये लोकसभा निवडणुका पार पडल्या. सर्व जगाचं लक्ष याकडे लागून होतं. २०१४ मध्ये जे परिवर्तन जे आलं होतं ते त्यापूर्वीच्या सरकारमुळे होतं की लोकांना परिवर्तन हवं होतं म्हणून होतं याची प्रचिती या निवडणुकीत आली.

२०१४ मध्ये ज्या सरकारला निवडलं त्यांना २०१९ मध्ये त्याच सरकारला आणखी मोठ्या संख्येनं निवडून दाखवलं. जनतेनं पुन्हा भाजपावर विश्वास दाखवला. लोकशाहीत जनतेच्या मतांवर शासन चालतं. लोकशाही भारताला नवीन नाही. प्राचीन काळापासून ही व्यवस्था भारतात होती. लोकशाही आम्ही पश्चिमी देशांकडून घेतली असं पश्चिमी राष्ट्रांनी हे समजू नये, असे मत मोहन भागवत यांनी व्यक्त केले.