Published On : Wed, Jul 18th, 2018

४१४ कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी ईडीतर्फे चौकशी

Nagpur : बँकेची ४१४ कोटी रुपयाने फसवणूक केल्याप्रकरणी पंजाब नॅशनल बँकेने दखल केलेल्या तक्रारीवरून मे. विन्सम डायमंड अ‍ॅण्ड ज्वेलरी लि. कंपनीविरुद्ध सीबीआय मुंबई येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

तसेच या प्रकरणाचची ईडी (अंमलबजावणी संचालनालय)तर्फे चौकशी सुरु अहे. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत उपस्थित एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.

Gold Rate
May 04- 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,50,400 /-
Gold 22 KT ₹ 1,39,900 /-
Silver/Kg ₹ 2,47,300/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अमित झनक, विजय वडेट्टीवाार, अमर काळे, अस्लम शेख, अमिन पटेल आदींनी यबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. यावर आपल्या लेखी उत्तरात मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मे. विन्सम डायमंड अ‍ॅण्ड ज्वेलरी लि. कंपनीचे माजी अध्यक्ष जतीन मेहता व इतर संचालकांनी स्टॅण्डर्ड चाार्टर्ड बँकेकडून प्राप्त केलेल्या ४१४ कोटी रुपयाच्या कर्ज सुविधेचा गैरवापर करून बँकेची फसवणूक केल्याचे तपसात निष्पन्न झाले आहे. यााप्र्रकरणी बीकेसी पाोलीस ठाणे ययेथे भादंवि कलम १२० (ब), ४२० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपसासाठी आर्थिक गुन्हे विभाग मुंबई यांच्याकडे प्रकरण वर्ग करण्यात आले आहे. तसेच पंजाब नॅशनल बँकेनेही यसंदर्भाात तक्रार केली असून सीबीआय मुंबईने देखील गुन्हे दााखल केले आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement