Published On : Mon, Jul 31st, 2023
By Nagpur Today Nagpur News

जयपूर-मुंबई पॅसेंजर एक्स्प्रेसमध्ये आरपीएफ जवानाकडून गोळीबार, ४ जणांचा मृत्यू

Advertisement

मुंबई : जयपूर-मुंबई सुपरफास्ट पॅसेंजर एक्स्प्रेसमध्ये आरपीएफ जवानाने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.या गोळीबारात ४ जणांचा मृत्यू झाला .

माहितीनुसार, जयपूर-मुंबई (गाडी क्र. १२९५६) ही सुपरफास्ट पॅसेंजर एक्स्प्रेस मुंबई सेंट्रलकडे जात होती. तेव्हा सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास गाडीत सुरक्षेच्या कारणास्तव कार्यरत असलेला आरपीएफ जवान चेतन कुमार याने एएसआय टिकाराम मीना यांच्यावर गोळीबार केला.

या गोळीबारात टिकाराम यांच्यासह अन्य तीन जण ठार झाल्याची माहिती समोर येत आहे. ही गाडी मुंबई सेंट्रल स्थानकात पोहोचली असून, ४ जणांचे मृतदेह शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

या घटनेनंतर आरपीएफ जवान चेतन कुमार गाडीमधून उडी टाकून फरार झाला होता. फरार आरोपी आरपीएफ जवान चेतनला भाईंदरमध्ये अटक करण्यात आली आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.