Published On : Fri, Feb 27th, 2026
By Nagpur Today Nagpur News

‘विरोश’चा शाही विवाह सोहळा; रश्मिका मंदाना – विजय देवरकोंडा अखेर विवाहबंधनात!

Advertisement

नागपूर – दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील बहुचर्चित जोडी अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा अखेर विवाहबंधनात अडकले आहेत. तब्बल सात वर्षांच्या रिलेशनशिपनंतर २६ फेब्रुवारी २०२६ रोजी या दोघांचा राजेशाही थाटात विवाहसोहळा पार पडला. लग्नानंतर समोर आलेले अधिकृत फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

उदयपूरमध्ये खाजगी आणि दिमाखदार सोहळा-
राजस्थानमधील नयनरम्य उदयपूर येथे हा विवाहसोहळा पार पडला. शहरापासून सुमारे २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या आलिशान ITC Mementos रिसॉर्टमध्ये अत्यंत खासगी स्वरूपात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

लग्नासाठी केवळ कुटुंबीय, जवळचे मित्र आणि तेलुगू चित्रपटसृष्टीतील निवडक कलाकारांनाच निमंत्रण देण्यात आले होते. गोपनीयता राखण्यासाठी समारंभात मोबाईल फोन वापरण्यावर पूर्ण बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे विवाहातील क्षण अधिकृत छायाचित्रकारांकडूनच टिपले गेले.

तेलुगू-आंध्र परंपरेनुसार सकाळचे विधी-
सकाळी विजय देवरकोंडा यांच्या मूळ तेलुगू-आंध्र परंपरेनुसार मुख्य विवाहविधी पार पडले. सप्तपदी, मंगळसूत्र बांधणे आणि वरमाला अशा पारंपरिक विधींमध्ये दोघेही भावूक झाल्याचे समोर आलेल्या फोटोंमधून दिसते. वरमाला घालताना दोघांच्या डोळ्यांत दाटलेले अश्रू चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

Advertisement

कोडावा परंपरेत सायंकाळचा समारंभ-
सायंकाळी रश्मिका मंदाना यांच्या कोडागू मूळ संस्कृतीनुसार कोडावा पद्धतीने दुसरा विवाहसोहळा पार पडला. दोन वेगवेगळ्या संस्कृतींचा सुंदर संगम या लग्नात पाहायला मिळाला. रश्मिकाने कोडावा शैलीतील पारंपरिक साडी परिधान केली होती. विशेष म्हणजे ही साडी तिला सासूकडून भेट म्हणून देण्यात आल्याची माहिती आहे.

अधिकृत फोटो व्हायरल; शुभेच्छांचा वर्षाव-
लग्नानंतर रश्मिका आणि विजय यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर विवाहातील पहिले अधिकृत फोटो शेअर केले. राजेशाही पार्श्वभूमी, पारंपरिक पोशाख आणि दोघांमधील सहज दिसणारी केमिस्ट्री यामुळे हे फोटो काही क्षणांतच व्हायरल झाले. चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.

‘विरोश’ म्हणून ओळखली जाणारी ही जोडी आता अधिकृतपणे पती-पत्नी झाली असून, त्यांच्या शाही विवाहसोहळ्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. वर्षातील सर्वात चर्चित सेलिब्रिटी विवाहांपैकी एक म्हणून या लग्नाची नोंद होत असून, नव्या आयुष्यासाठी या जोडप्यावर सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.