Published On : Mon, Aug 3rd, 2020

इंग्लिश मिडीयम मधून ज्ञानदीप कॉनवेंट रामटेक ची रितिका राठोड ही प्रथम

रामटेक– ज्ञानदीप कॉन्व्हेन्ट रामटेक च ऐकून निकाल 99.25 टक्के लागला असून. रामटेक तालुक्यात इंग्लिश मिडीयम मधून ज्ञानदिप कॉन्व्हेंट शीतलवाडी येथून रितिका अनिल राठोड हिने 95.00 टक्के घेऊन प्रथम येण्याचा मान पटकविला तर द्वितीय मृणालि मनोज मेश्राम हिने तर शिवानी कैलास बादुले तृतीय क्रमांक पटकाविला विनोद मेहता, कादंबरी बेडेकर हर्षाली डहारिया, कनिका लांजेवार, पियूष भोयर, प्राची उमले, प्रग्गया झा, अनुजा लोणारे, रूचा मोसरे , चैताली वांढरे, विघ्नेश भोगे, खुशी चंने, ह्या सर्व विद्यार्थ्यांनी 90 टक्के च्या वर गुण प्राप्त केले आहे.

या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन व सत्कार संस्थेचे अध्यक्ष गजेंद्र चौकसे , सचिव केवल हटवार , बबन सहारे , यशवंत सहारे, प्राचार्य गीता भास्कर, उपप्राचार्य अरुणा सोणकर, व शिक्षक स्टाफ यांनी केला. शाळेमध्ये निकालाच्या वेळी उत्साह आणि आनंददायी वातावरण होते. शाळेच्या वतीने गुणवन्त विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन गौरव सत्कार करण्यात आला. यावेळी पालकांनीही उपस्थिती लावली. . ग्रामीण पत्रकार संघ तर्फे मास्क, सैनीटाईझ , व पुष्प देऊन गौरव करण्यात आला .