Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Thu, Apr 15th, 2021

  रिच – ४ व्हायाडक्ट आणि स्टेशनचे ९०% कार्य पूर्ण

  – सी.ए. रोड येथील मेट्रो स्टेशनचे निर्माण कार्य गतीने सुरु

  नागपूर – महा मेट्रोच्या सिताबर्डी ते प्रजापती नगर कॉरीडोरचे कार्य जलद गतीने सुरु असून, रिच – ४ या मार्गिकेवर जलद गतीने रूळ बसविण्याचे कार्य सुरु आहे. तसेच मेट्रो या मार्गिके वरील ९० % व्हायाडक्ट आणि स्टेशनचे निर्माण कार्य पूर्ण झाले आहे.

  मुख्य बाब म्हणजे या मार्गिकेवर महा मेट्रो देशातील २३१.२ मीटर लांबीचा ब्रिज आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून आनंद टॉकीज, सिताबर्डी ते कॉटन मार्केट पर्यत निर्माण कार्य सुरु आहे. भारतीय रेल्वेच्या ट्रॅक वरून १०० मीटरचा एक स्पॅन (३ मीटरचा एक गर्डर) या रेल्वे ट्रक वरून राहणार आहे.

  सिताबर्डी इंटरचेंज ते प्रजापती नगर मेट्रो स्टेशन दरम्यान ८.३० किमीच्या या मार्गावर एकूण ०९ मेट्रो स्टेशन प्रस्तावित आहे ज्यामध्ये कॉटन मार्केट,नागपूर रेल्वे स्टेशन,दोसर वैश्य चौक,अग्रसेन चौक, चितार ओळी, टेलीफोन एव्सचेंज चौक, आंबेडकर चौक, वैष्णोदेवी चौक,प्रजापती नगर मेट्रो स्टेशनचा समावेश आहे. नागपूरच्या पूर्व आणि पश्चिम नागपूर भागांना सेंट्रल एव्हेन्यू हा एक प्रमुख मार्ग आहे.

  या मेट्रो मार्गिकेला लागून गांधीबाग, इतवारी, मस्कासाथ इत्यादी असे प्रमुख व्यापारिक क्षेत्र आहे. वाहतुकीची सुविधा या क्षेत्राकरता महत्वाची असून, मेट्रो रेल सेवेच्या माध्यमाने निश्चितच हे पूर्ण होणार आहे. नागपूरचा सेन्ट्रल एव्हेन्यू परिसर व्यावसायिक स्वरूपाचा असल्याने वाहनांचे मोठ्या प्रमाणात आवागमन येथून होते.नागपूर शहराचा विस्तार होत असतांना या मार्गवरील वाहतूक देखील सातत्याने वाढली. बाजारपेठ वाहतुकीच्या गर्दीमुळे प्रकल्प राबवतांना मेट्रोने पुरेपूर काळजी घेतली. या मार्गीकेवरील प्रवासी सेवा सुरु झाल्यावर मेयो हॉस्पिटल,रेल्वे स्थानक,कॉटन मार्केट,इतवारी बाजारपेठ इत्यादी ठिकाणी जाणे सोईस्कार ठरेल.

  आतापर्यंत झालेल्या कार्याची अधिकृत आकडेवारी पुढील प्रमाणे आहे :
  पाईल्स १२८४ पैकी १२८४, पाईल कॅप २५० पैकी २५०,पियर २६६ पैकी २६२ , पियर कॅप २६५ पैकी २६२,पियर आर्म ४५ पैकी ४५, ट्रॅक आर्म ४४ पैकी ४४ ,, सेग्मेंट कास्टिंग २३९३ पैकी २३९३ , स्पॅन इरेव्क्शन २४९ पैकी २३०, क्रॅश बॅरियर फिव्कसिंग (pier protection) २५० पैकी २४३, पूर्ण झाले आहे.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145