Published On : Mon, Nov 27th, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील तालांवच्या पुनरुज्जीवनाची कामे रखडली? 100 कोटींचा निधी मिळूनही काम संथ गतीने

Advertisement

नागपूर : शहरातील गांधीसागर, सोनेगाव आणि सक्करदरा तलावाचे पुनरुज्जीवनाची कामे अद्यापही रखडली आहे. राज्य शासनाकडून या कामांसाठी 100 कोटी रुपयांचा निधी नागपूरला मिळाला आहे. मात्र तरीही कामे होत नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. विलंबामुळे या प्रकल्पाच्या खर्चाच्या वाढीचाही मार्ग मोकळा होत असल्याने जाणीवपूर्वक संथगतीने कामे तर केली जात नाही ना, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

नागपुरात एकूण ११ तलाव आहेत. मात्र या तलावांची दुर्दशा अत्यंत दयनीय अशी झाली आहे. हे पाहता महापालिकेने गांधीसागर, सोनेगाव आणि सक्करदरा या तीन तलावांच्या पुनरुज्जीवनाचे काम सुरू केले. राज्याकडून या तिन्ही तलावांसाठी 100 कोटी रुपये मिळाले असून जानेवारी 2024 पर्यंत काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे एका अधिकाऱ्याने नमुद केले. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून या तलावांचे काम संथ गतीने होत असल्याचे चित्र आहे.

Gold Rate
July 15 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 42,700 /-
Gold 22 KT ₹ 1,32,400 /-
Silver/Kg ₹ 2,23,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कामांच्या संथगतीमुळे या तिन्ही तलावाच्या पुनरुज्जीवनाचा खर्चही वाढला आहे. वाढत्या खर्चामुळे हे तिन्ही तलाव कंत्राटदारांसाठी फायद्याचे ठरणार अशी चर्चा आहे. त्यामळे मुद्दाम तलावांची कामे संथ गतीने तर करण्यात येत नाही ना ? असा सवाल नागपूरकरांनी उपस्थित केला. या तलावांची कामे वेगवान गतीने होत नसल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही नाराजी व्यक्त केली. परंतु महापालिकेला त्याचेही काही देणेघेणे नसल्याचे दिसून येत आहे. राज्य सरकारने दुसऱ्या टप्प्यात गांधीसागर तलावासाठी 31.45 कोटी, सोनेगाव तलावासाठी 17.32 कोटी तर सक्करदरा तलावासाठी 9.99 कोटी मंजूर केले आहे. गांधीसागर आणि सक्करदरा या दोन्ही तलावांच्या पुनरुज्जीवनाची कामे महापालिकेच्या झोन कार्यालयांतर्गत सुरू आहेत. राज्य सरकारच्या निधीची प्रतीक्षा केल्याने कामांना विलंब होत असल्याने अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. हे पाहता वर्षानुवर्षे रखडलेल्या तलावांच्या पुनरुज्जीवनाचे काम गतीने कधी सुरु होणार याची नागपूरकरांना प्रतीक्षा आहे.

सरकारकडून तलावांची मिळालेला निधी : गांधीसागर तलाव – 31.45 कोटी, सोनेगाव तलाव 17.32 कोटी, सक्करदरा तलाव 9.99 कोटी. लेंडी तलाव – 14.13 कोटी, नाईक तलाव – 12.95 कोटी, पोलिस लाईन तलाव – 8 कोटी, बिनाकी तलाव – 6.70 कोटी

Advertisement
Advertisement
शराब पार्टी के बाद 6.60 लाख पर हाथ साफ! #NagpurNews #Crime #Fraud #Theft #WeddingScam #Photographer

शराब पार्टी के बाद 6.60 लाख पर हाथ साफ! #NagpurNews #Crime #Fraud...

फर्जी पेमेंट स्क्रीनशॉट से सायाजी होटल में ठगी... #NagpurNews #FakePayment  #HotelFraud #crimenews

फर्जी पेमेंट स्क्रीनशॉट से सायाजी होटल में ठगी... #NagpurNews #FakePayment #HotelFraud #crimenews

नागपुर के कलमना और नंदनवन इलाके में दुष्कर्म की घटनाएं #NagpurNews #CrimeNews #PoliceAction #Justice

नागपुर के कलमना और नंदनवन इलाके में दुष्कर्म की घटनाएं #NagpurNews #CrimeNews...

उर्स की भीड़ में कार पर वार! #NagpurNews #CrimeNews #Theft #CarTheft #BagLifting #NagpurPolice

उर्स की भीड़ में कार पर वार! #NagpurNews #CrimeNews #Theft #CarTheft #BagLifting...

व्हाट्सऐप पर मुनाफे का झांसा... #NagpurNews #CyberFraud #WhatsAppScam #CyberCrime #InvestmentScam

व्हाट्सऐप पर मुनाफे का झांसा... #NagpurNews #CyberFraud #WhatsAppScam #CyberCrime #InvestmentScam

ताजबाग उर्स में युवक पर पत्थरों से जानलेवा हमला #vidharbnews #nagpur #newsupdate #crimenews

ताजबाग उर्स में युवक पर पत्थरों से जानलेवा हमला #vidharbnews #nagpur #newsupdate...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges