Published On : Wed, Jul 2nd, 2025
By Nagpur Today Nagpur News

कोराडीच्या वस्त्रप्रक्रिया प्रकल्पात कुचराई खपवून घेणार नाही महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा बैठकीत इशारा

सोशल बफेट संस्थेला तीन महिन्यांची मुदतवाढ |चांगल्या पद्धतीने काम करण्याचे दिले आदेश*
Advertisement

मुंबई : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कोराडी येथे बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरु करण्यात आलेला प्रकल्प चांगल्या पद्धतीने चालविण्यात यावा. यासाठी आवश्यकता वाटल्यास आणखी निधीची तरतूद करण्यात येईल. मात्र, आता यामध्ये कुचराई केलेली खपवून घेणार नाही असा इशारा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.
विधानभवनातील महिला व बाल कल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. त्यावेळी महसूलमंत्री बोलत होते.

महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले, कोराडी येथे महिलांच्या सक्षमीकरणासाठी वस्त्रोद्योग उभारण्यात आला आहे. याठिकाणी चांगले काम सुरु असताना इचलकरंजी येथील वरद कंपनीने योग्यप्रकारे मशीनचा पुरवठा न केल्याने योग्यप्रकारे काम झालेले नाही. त्यामुळे वरद या कंपनीवर गुन्हे दाखल करुन त्यांच्याकडून मशीनचा पुरवठा तात्काळ करुन घेण्यात यावा. तसेच सर्वात चांगले काम करण्याच्या उद्देशाने या प्रकल्पाचे काम करावे अशा सूचनाही त्यांनी केल्या.

Gold Rate
July 23 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 45,900 /-
Gold 22 KT ₹ 1,35,400 /-
Silver/Kg ₹ 2,27,000/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या, सोशल बफेट या कंपनीवर करण्यात आलेली कारवाई चुकीची असून त्यांना पुढील तीन महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात येत आहे. या कालावधीत त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करावयाचे आहे. मात्र, यापुढे असे होता कामा नये. पुन्हा चुकीचा प्रकार घडला तर यापुढे कोणतेही काम देण्यात येणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

Advertisement
Advertisement
धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे से लड़ाई नहीं रुकेगी #StudentProtest #Congress #Trending #NEETScam #news

धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे से लड़ाई नहीं रुकेगी #StudentProtest #Congress #Trending #NEETScam...

Instagram पर Part Time Job के नाम पर ₹6.84 लाख की ठगी #CyberFraud #InstagramScam #Fraud #JobScam

Instagram पर Part Time Job के नाम पर ₹6.84 लाख की ठगी...

₹150 के लालच में चाकू से हमला! #NagpurCrime #Crime #ERickshaw #PoliceAction #CCTV #CrimeBranch #news

₹150 के लालच में चाकू से हमला! #NagpurCrime #Crime #ERickshaw #PoliceAction #CCTV...

पार्किंग विवाद ने लिया हिंसक रूप! #NagpurNews #Crime #ParkingDispute  #VikasThakre #PoliceAction

पार्किंग विवाद ने लिया हिंसक रूप! #NagpurNews #Crime #ParkingDispute #VikasThakre #PoliceAction

रॉन्ग साइड से आई मौत! #Accident #HighwayAccident #NagpurNews #MaharashtraNews #TruckAccident #news

रॉन्ग साइड से आई मौत! #Accident #HighwayAccident #NagpurNews #MaharashtraNews #TruckAccident #news

RSS मुख्यालय को लेकर X पर भ्रामक पोस्ट करने का आरोप #vidarbhanews #nagpur #nagpurnews #news

RSS मुख्यालय को लेकर X पर भ्रामक पोस्ट करने का आरोप #vidarbhanews...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges