Published On : Thu, Aug 31st, 2017

सेवानिवृत्तीनिमित्त मनपातील २२ कर्मचाऱ्यांचा सत्कार

नागपूर: नागपूर महानगरपालिकेत विविध विभागात कार्यरत २२ कर्मचारी गुरुवारी (३१ ऑगस्ट) सेवानिवृत्त झाले. मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृति सभागृहात आयोजित कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी निगम अधीक्षक राजन काळे, मनपा कर्मचारी महासंघाचे कार्याध्यक्ष राजेश हाथीबेड, सहायक अधीक्षक दत्तात्रय डहाके, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर उपस्थित होते. निगम अधीक्षक राजेश काळे यांनी यावेळी सेवानिवृत्त होत असलेल्या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आणि मनपाला दिलेल्या नि:स्वार्थ सेवेबद्दल आभार मानले. सेवानिवृत्तीच्या वेळी त्यांना त्यांचे धनादेश देण्याची मनपाने सुरू केलेल्या परंपरेचा त्यांनी गौरवोल्लेख केला. मनपा कर्मचारी महासंघाचे कार्याध्यक्ष राजेश हाथीबेड यांनीही यावेळी अधिकारी, कर्मचाऱ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त केली.

यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व २२ कर्मचाऱ्यांचा शाल, श्रीफळ, तुळशी रोपटे, स्मृतिचिन्ह आणि धनादेश देऊन सत्कार करण्यात आला. निवृत्त झालेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये राजस्व निरीक्षक एस.पी. पोहरे, कर संग्राहक एन. एम. बाभूळकर, मुख्याध्यापक सुनंदा गहलोद यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि संचालन जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी केले.