Published On : Wed, May 15th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपूरचे सुपुत्र निवृत्त कर्नल वैभव काळे यांना गाझामध्ये वीरमरण

Advertisement

नागपूर : युनायटेड नेशन्स डिपार्टमेंट ऑफ सेफ्टी अँड सिक्युरिटीमध्ये नुकतेच रुजू झालेले भारतीय सैन्य दलातील कर्नल वैभव अनिल काळे हल्ल्यात शाहिद झाले आहे. हॉस्पिटलची तपासणी करण्यासाठी जात असताना त्यांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्यात त्यांना वीरमरण प्राप्त झालं. कर्नल वैभव काळे हे गाझा येथून रफा येथील युरोपियन रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी जात होते. त्याचवेळी त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला.

नागपूरशी खास कनेक्शन-
वैभव काळे हे मुळचे नागपूरचे आहेत. त्यांचे शालेय शिक्षण नागपूरच्या भवन्स विद्यामंदिरात झाले आहे. शहीद वैभव काळे हे पुण्यात राहत होते.महिन्याभरापूर्वी ते संयुक्त राष्ट्र संघात सुरक्षा सेवा निरीक्षक म्हणून रुजू झाले होते, याबाबतची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. काळे यांच्या पार्थिवावर पुण्यातच अंत्यसंस्कार होणार असल्याचे त्यांचे मेहुणे निवृत्त विंग कमांडर प्रशांत कार्डे यांनी सांगितले. वैभव काळे यांनी 2022 मध्ये मुदतपूर्व निवृत्ती घेतली होती.

संयुक्त राष्ट्र संघाच्या निवेदनानुसार, वैभव काळे हे त्यांच्या सहकाऱ्यासह युएनच्या वाहनातून राफा येथील युरोपियन रुग्णालयात जात असताना सकाळी हा हल्ला झाला. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी संयुक्त राष्ट्राच्या कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

Advertisement