Published On : Thu, Jan 27th, 2022

नागपूर विद्यापीठाच्या पाली व बौद्ध अध्ययन केंद्राद्वारे गणराज्य दिन साजरा

Advertisement


राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बौध्द अध्ययन व पाली पदव्युत्तर विभागाच्या वतीने आज 72 वा गणराज्य दिवस विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय बौद्ध अध्ययन केंद्र परिसरात राष्ट्रीय ध्वज फडकवून व भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाचन करून शिक्षक, विद्यार्थी व कर्मचाऱ्याच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.

ध्वजारोहण नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण परिषदेचे संचालक डॉ अभय मुद्गल यांच्या हस्ते करण्यात आले. भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाचन पाली पदव्युत्तर विभागाचे विभाग प्रमुख प्रो डॉ नीरज बोधी यांनी केले. विद्यापीठाच्या वि भी कोलते ज्ञानस्त्रोत केंद्राचे (ग्रंथालय) संचालक विजय खंडाळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

याप्रसंगी प्रामुख्याने प्रा. डॉ कुमुद मेश्राम, प्रा. डॉ ज्वाला डोहाणे, प्रा. डॉ सरोज वाणी, प्रा. ममता सुखदेवे, डॉ तुळसा डोंगरे, बुद्धीस्ट स्टुडंट असोसिएशनचे सचिव उत्तम शेवडे तसेच राकेश सहारे, संजय शेंडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.