Published On : Wed, Sep 21st, 2022
By Nagpur Today Nagpur News

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार्थी संघटनेचे समाजकल्याण प्रादेशिक उपायुक्तांना निवेदन

Advertisement

नागपूर : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार्थी संघटनेद्वारे विविध मागण्यांच्या संदर्भात समाजकल्याणचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांना निवेदन दिले.

संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत वानखेडे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने यावेळी विविध मागण्यांच्या संदर्भात डॉ. गायकवाड यांच्याशी चर्चा केली.

Gold Rate
Sept 12,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,400 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,31,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

संघटनेद्वारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार्थींना किमान १ हजार रुपये मानधन मिळावे, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस प्रवास सवलतीची ४ हजार किमीची मर्यादा काढून टाकावी, बस प्रवासात एका व्यक्तीसोबत एक व्यक्ती असे पत्र शासनाकडून एस.टी. महामंडळाला देण्यात यावे, महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही बसेसमध्ये सवलत देण्यात यावी, शासकीय विश्रामगृहात आरक्षण देण्यात यावे, वैद्यकीय कार्ड बनवून देण्यात यावे तसेच वैद्यकीय वीमा काढून त्याचे हप्ते शासनाच्या वतीने भरण्यात यावे, महाराष्ट्र सदन दिल्ली येथे रुमचे आरक्षण देण्यात यावे, पुरस्कार्थीचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीला मानधन देण्यात यावे, पुरस्कार्थींचे नावे कार्यालयात दर्शनी भागात लावण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाद्वारे समाजकल्याणचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांना सोपविण्यात आले.

ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाने वागविले पाहिजे असे शासनाचे धोरण असताना देखील त्याचे पालन होत नसल्याबाबत यावेळी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत वानखडे खंत व्यक्त केली व उपरोक्त मागण्या मान्य करण्याची मागणी केली.

Advertisement

समाजकल्याणचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांनी शिष्टमंडळाशी चर्चा करून विभागाद्वारे सर्व मागण्यांवर सकारात्मकरित्या कार्यवाही करण्यात येणार असल्याचे आश्वासीत केले.

याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष जीवन गायकवाड, मुख्य सचिव प्रभुदास तायवाडे, बुधाजी सुरकर, शंकरराव वानखडे, प्रभुदास तायवाडे, अशोक भावे, डी.एम कावळे, श्रीमती सुधाताई बावणे, नत्थुजी उकुंडे, कृष्णाजी वानखडे, शंकरराव ठोसर, राजेश खंडारे आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.