Published On : Wed, May 30th, 2018

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूकीसाठी फेरमतदान, ४५.८६ टक्के मतदान

Advertisement


भंडारा: भंडारा-गोेंदिया लोकसभा पोटनिवडणूकीसाठी काल २९ मे रोजी घेण्यात आलेल्या मतदान प्रक्रियेदरम्यान इव्हीएम यंत्रांमध्ये बिघाड आला होता. यामुळे अनेक मतदार मतदानापासून वंचित राहिले. यामुळे फेरमतदान घेण्याची मागणी करण्यात आली होती. आज ३० मे रोजी ४९  मतदान केंद्रांवर घेण्यात आलेल्या फेरमतदान प्रक्रियेत ४५.८६ टक्के मतदान झाले आहे.

पुरूष मतदारांच्या मतदानाची टक्केवारी ४६.०६  असून महिला मतदारांच्या मतदानाची टक्केवारी ४५.६६ टक्के आहे. भंडारा विधानसभा क्षेत्रात ५३.०५, साकोली विधानसभा क्षेत्रात ५६.९७ टक्के, अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात ६३.०३ टक्के, तिरोडा विधानसभा क्षेत्रात ५२.०४ टक्के व गोंदिया विधानसभा क्षेत्रात ३७.३५ टक्के मतदान झाले आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Gold Rate
Sept 12,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,400 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,31,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.