Published On : Mon, Nov 8th, 2021

धार्मिक स्थळे, शैक्षणिक संस्थाने, परिवहन व्यवस्था, शासकीय कार्यालयात लसीचे दोन डोज आवश्यक

मनपा आयुक्तांचे ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत नवे आदेश : ९ नोव्हेंबरपासून अंमलबजावणी


नागपूर : कोविडच्या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सोमवारी (ता. ८) ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत नवे आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार, विविध आस्थापनांवर कार्यरत कर्मचाऱ्यांना व तिथे येणा-या सर्व नागरिकांना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस बंधनकारक राहतील तर काही ठिकाणी किमान एक डोस आवश्यक आहे. हा आदेश मंगळवार ९ नोव्हेंबरपासून लागू होईल. नागपूरात लसीकरण मोहिमेला गति देण्यासाठी मनपा तर्फे हया संबंधीचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे. मनपा तर्फे सर्व ठिकाणी आकस्मीक तपासणी करण्यात येईल. अनियमितता आढळयास दंडात्मक कारवाई सुध्दा होईल.

मनपाच्या आदेशानुसार धार्मिक स्थळी काम करणाऱ्या सर्व व्यवस्थापन व कर्मचारी आणि प्रवेश करणाऱ्या नागरिकांच्याही कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण झालेल्या असणे आवश्यक राहील. लसीकरण प्रमाणपत्र व फोटो ओळखपत्र प्रवेशद्वारावर दाखविणे आवश्यक राहील. सामाजिक कार्यक्रम, सभा, संमेलने, धार्मिक यात्रा, उत्सवामध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांच्याही दोन मात्रा पूर्ण असणे आवश्यक राहील.

Advertisement

सरकारी, निमसरकारी व खाजगी कार्यालय, तत्सम संस्थांध्ये कार्यरत कर्मचारी, अधिकारी, कामानिमित्त येणारे १८ वर्षांवरील सर्व अभ्यागतांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीच्या दोन मात्रा किंवा किमान पहिली मात्रा झालेली असणे आवश्यक राहील. शहरातील सर्व उद्याने, वाचानलये, अभ्यासिका, मंगल कार्यालय, लॉन, सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या सर्व १८ वर्षांवरील नागरिकांनी कोविड प्रतिबंधात्मक लसीची किमान एक मात्रा घेतलेली असणे आवश्यक आहे. शाळा, महाविद्यालये, शिकवणी वर्ग, प्रशिक्षण संस्था आदीमध्ये कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीच्या दोन मात्रा पूर्ण असणे आवश्यक राहील. सार्वजनिक परिवहन व्यवस्थे अंतर्गत येणाऱ्या महामंडळ, शहर बस वाहतूक, ऑटो, रिक्षा याद्वारे प्रवास करणाऱ्या १८ वर्षावरील सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण झालेले असावे. बाजार व दुकानांमध्ये असणारे मालक व काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्याही लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण झालेल्या असणे आवश्यक आहे. शहरातील विविध भागात पदपाथावर हातठेले व तत्सम प्रकारचे सर्व विक्रेत्यांच्या किमान एक मात्रा झालेली असणे आवश्यक आहे. सरकारी, निमसरकारी व खाजगी आरोग्य संस्थांत कार्यरत सर्वांच्या लसीकरणाच्या दोन्ही मात्रा पूर्ण झालेल्या असणे आवश्यक राहील. इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कामगारांच्या किमान एक मात्रा झालेली असणे आवश्यक आहे.

या सर्व ठिकाणी आदेशानुसार, लसीकरणाचे प्रमाणपत्र फोटो ओळखपत्रासोबत दाखविणे आवश्यक राहील. १८ वर्षाखालील मुला-मुलींना त्यांच्या वयाचा योग्य पुरावा दाखविणे आवश्यक राहील. विशेष म्हणजे नागपूर महानगरपालिकेतर्फे आकस्मीक तपासणी करण्यात येईल. अनियमितता आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement