Published On : Mon, May 13th, 2024
By Nagpur Today Nagpur News

अरविंद केजरीवालांना दिलासा; मुख्यमंत्रिपदावरून हटवण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Advertisement

नवी दिल्ली:सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पुन्हा मोठा दिलासा दिला. अगोदर न्यायालयाने केजरीवाल यांना १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला होता.

केजरीवाल यांना आणखी एक दिलासा देत केजरीवाल यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी अरविंद केजरीवाल हेच विराजमान राहतील.

दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांना २१ मार्च रोजी ईडीने अटक केली होती. त्यानंतर ते तिहार जेल मध्ये होते. न्यायालयाने १ जूनपर्यंत अंतरिम जामीन दिला. पण १ जूनला केजरीवाल यांना पुन्हा आत्मसमर्पण करावे लागणार आहे.

Advertisement

केजरीवाल यांना ज्यावेळी ईडीकडून अटक झाली होती. त्यानंतर त्यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्यात यावे, अशी मागणी भाजपाच्या काही नेत्यांनी केली होती. मात्र आता सर्वोच्च न्यायालयानेच यासंदर्भातील याचिका फेटाळल्यामुळे केजरीवालांसाठी हा मोठा दिलासा मानला जातो.