नागपूर – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. फेब्रुवारीपासून प्रलंबित असलेले हप्ते आता टप्प्याटप्प्याने खात्यात जमा होऊ लागले आहेत. गुरुवारी मार्च महिन्याचा हप्ता जमा झाल्यानंतर, शुक्रवारी पुन्हा एप्रिल महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता लाभार्थींच्या खात्यात वर्ग करण्यात आला. त्यामुळे अनेक महिलांच्या खात्यात दोन दिवसांत एकूण 3000 रुपये जमा झाले आहेत.
फेब्रुवारीपासून हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या लाखो लाभार्थी महिलांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यांचे हप्ते मिळाल्याने आर्थिक ताण काही प्रमाणात हलका झाला आहे.
मार्च-एप्रिल हप्त्यांचे वितरण सुरू
मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकारच्या वतीने 14 आणि 15 मे रोजी अनुक्रमे मार्च आणि एप्रिल महिन्यांच्या हप्त्यांचे वितरण करण्यात आले. यापूर्वी 24 मार्च रोजी फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा करण्यात आला होता. त्यानंतर मार्च आणि एप्रिलच्या हप्त्याची प्रतीक्षा लाभार्थी महिलांना होती.
योजनेतील लाभार्थ्यांची संख्या घटली
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारने लोकसभा निवडणुकीनंतर सुरू केली होती. जुलै 2024 पासून ही योजना कार्यान्वित असून, दरमहा पात्र महिलांच्या खात्यात थेट आर्थिक मदत जमा केली जाते.
या योजनेसाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असणे ही प्रमुख अट ठेवण्यात आली आहे. तसेच इतर निकषही निश्चित करण्यात आले आहेत. दरम्यान, ई-केवायसी प्रक्रियेदरम्यान काही त्रुटी आणि चुकीची माहिती आढळल्याने काही लाभार्थी वगळण्यात आले आहेत.
शासनाकडून पात्र महिलांना दुरुस्तीची संधी देण्यात आली होती, ज्याची अंतिम मुदत 30 एप्रिलपर्यंत होती.
दरम्यान, दोन महिन्यांचे हप्ते एकत्र जमा झाल्याने लाभार्थी महिलांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
ASTRO BUZZ | Weekly Talk – Episode 3 | 23–29 August Predictions
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
चीनी की महंगाई पर अनोखा आंदोलन! पेट्रोल पंप पर बांटी चीनी #SugarPrice...
चीनी की जमाखोरी पर प्रशासन का बड़ा एक्शन! #sugarprices #SugarHoarding #MaharashtraNews #newsupdate




