Published On : Thu, Apr 12th, 2018

काटोल, नरखेड येथील वीज उपकेंद्राचे शुक्रवारी लोकार्पण

Mahavitaran Logo Marathi
नागपूर: महाराष्ट्र राज्य विदुयत वितरण कंपनीच्या वतीने काटोल आणि नरखेड येथे पायाभूत आराखडा-२ योजने अंतर्गत उभारण्यात आलेल्या तीन ३३/११ के.व्ही. वीज उपकेंद्राचे लोकार्पण शुक्रवार दिनांक १३ एप्रिल रोजी ऊर्जा,नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार आहे.

महावितरणच्या पायाभूत आराखडा-२ योजने अंतर्गत नरखेड तालुक्यातील वडविहारा आणि तीनखेडा, काटोल तालुक्यातील कचारी सावंगा (रिधोरा) येथे काटोल आणि नरखेड तालुक्यातील वीज ग्राहकांना अखण्डित आणि दर्जेदार वीज पुरवठा व्हावा यासाठी वरील ठिकाणी नवीन वीज उपकेंद्राचे उभारणी करण्यात आली आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार कृपाल तुमाने, विशेष अतिथी म्हणून आमदार आशिष देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्ष निषाताई सावरकर, महावितरणचे नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत, मुख्य अभियंता रफिक शेख, अधीक्षक अभियंता नारायण आमझरे, उमेश शहारे उपस्थित राहणार आहेत. लोकार्पण कार्यक्रमास जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.