Published On : Mon, Nov 8th, 2021

छटपूजेकरिता नागपूर शहरात नियम शिथील करा…!

Advertisement

महापौर दयाशंकर तिवारी यांचे मुख्यमंत्र्याना विनंती पत्र

नागपूर : नागपूर शहरात गेल्या अडीच महिन्यांपासून कोरोना पूर्णपणे नियंत्रणात आहे. ही सकारात्मक बाब लक्षात घेता यावर्षी नागपूर शहरात छट पूजा सार्वजनिक स्वरूपात साजरी करण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती महापौर दयाशंकर तिवारी यांनी मुख्यमंत्रयांकडे केली आहे.

या आशयाचे पत्र शनिवारी (ता. ६) मुख्यमंत्र्याना पाठविण्यात आले आहे महापौर दयाशंकर तिवारी यांनी पत्रात नमूद केल्यानुसार, मागील वर्षी कोरोनाचा भयावह परिस्थिती लक्षात घेता छटपूजा उत्सव सार्वजनिक स्वरूपात करण्यास बंदी घालण्यात आली होती. यावर्षीसुद्धा हा उत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा करण्यात येणार नाही यासंदर्भातील पत्र नुकतेच प्राप्त झाले आहे

कोरोना नागपूर शहरात पूर्णपणे नियंत्रणात आहे. मागील अडीच महिन्यात नागपूर शहरात कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नाही तर दोन महिन्यांपासून दररोजचा रुग्णाचा आकडा १० च्या वर गेला नाही. असे असताना नागपूर शहरात छट पूजा साजरी करण्यास बंदी घातल्यास नागरिक नाराज होतील. नागपुरातील कोरोनाचा परिस्थिती आणि नागरिकांच्या भावना लक्षात घेता छट पूजेच्या संदर्भाने शासनाने यावर्षी काढलेल्या परिपत्रकातून नागपूर शहराला वगळण्यात यावे, अशी विनंती महापौरांनी केली आहे.