Published On : Fri, Jan 26th, 2018

क्षेत्रीय प्रचार कार्यालयाच्‍या वतीने विहीरगाव येथील सूर्योदय अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्‍ट्रीय मतदार दिन साजरा

नागपूर : केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्‍या अंतर्गत येणा-या क्षेत्रीय प्रचार कार्यालयाच्‍या वतीने राष्‍ट्रीय मतदार दिन उमरेड तालुक्यातील विहीरगाव येथील सूर्योदय अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयात साजरा करण्‍यात आला . भारत हा जागतिक पातळीवर सर्वात मोठा लोकशाहीप्रधान देश असून या लोकशाही परंपरेच्‍या बळकटीसाठी युवा मतदारांचा सहभाग आवश्‍यक असल्‍याचे मत क्षेत्रीय प्रचार अधिकारी मनोज सोनोने यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना व्‍यक्‍त केले.

25 जानेवारी हा दिवस दरवर्षी राष्‍ट्रीय मतदार दिन म्‍हणून साजरा केला जातो. क्षेत्रीय प्रचार कार्यालयाच्‍या वतीने आयोजित या मतदार दिनाच्‍या कार्यक्रमास सूर्योदय अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष चेडे, उपप्राचार्य प्रा. विवेक पराते , एन.एस.एस. चे समन्‍वयक डॉ. राजेन्‍द्र हाडके तसेच केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्‍या फिल्‍म डिवीजनचे ( चित्रपट प्रभाग) मंगेश टीक्‍कस उपस्‍थित होते.

Advertisement

लोकशाही मध्‍ये प्रत्‍येक मत हे महत्‍वाचे असते. एक मतही सरकार घडवू शकते किंवा पाडूही शकते. मताचे हे सामर्थ्य लक्षात घेउुन प्रत्‍येक मतदाराने मतदानाचा हक्‍क बजावणे आवश्‍यक असल्‍याचे प्रतिपादन सोनोने यांनी यावेळी केले.

याप्रसंगी उपस्‍थितांना मतदान करण्‍यासंबंधीची शपथ देण्‍यात आली. महाविद्यालयाचे विद्यार्थी , प्राध्‍यापक तसेच क्षेत्रीय प्रचार कार्यालयाचे प्रचार सहायक रामचंद्र सोनसळ या वेळी उपस्‍थित होते.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement