Published On : Thu, Nov 28th, 2019

प्रादेशिक लोक संपर्क ब्‍यूरो तर्फे ‘’कृषी व ग्रामीण क्षेत्रासाठी शासकीय पुढाकार’’ या विषयावर मल्टीमिडिया चित्रप्रदर्शनचे जनाकर्षणाचे केन्‍द्र

Advertisement

केन्‍द्रीय मंत्री मा. नितीन गडकरी यांच्‍या हस्‍ते उद्घाटन

नागपुर: भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्‍या प्रादेशिक लोक संपर्क ब्‍यूरो, (महाराष्ट्र व गोवा प्रदेश) यांच्या वतीने रेशीमबाग ग्राउंड, नागपुर येथील स्टॉल नंबर D79 व D81 मध्ये 11 वे अँग्रो व्हिजन निमित्ताने कृषी व ग्रामीण क्षेत्रासाठी शासकीय पुढाकार या विषयावर मल्टीमिडिया चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. एग्रोविजन चे मुख्‍य कार्यक्रमाच्‍या उद्घाटनानंतर सायंकाळी मा. श्री नितीनजी गडकरी, रस्ते वाहतूक व महामार्ग आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, जहाजबांधणी मंत्री. यांच्‍या हस्‍ते या मल्टीमिडिया चित्रप्रदर्शनाचे दिनांक 22 नोव्हेंबर 2019 रोजी फित कापून उदघाटन करण्‍यात आले.

Gold Rate
Sept 10,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 54,700 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,39,700/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

उद्घाटन सत्रानंतर ॲग्रोव्हिजन प्रदर्शनीत लावण्यात आलेल्या स्टॉल्सला सुद्धा गडकरी यांनी भेट दिली. माहिती प्रसारण मंत्रालयाच्या लोक संपर्क ब्युरोच्या ‘केंद्र सरकारच्या कृषी व ग्रामीण भागातील धोरणाविषयीच्या’ माहिती प्रदर्शनाचे उद्घाटनही त्यांनी यावेळी केले. 22 ते 25 नोव्हेंबर दरम्यान चालणाऱ्या चार दिवसीय कार्यशाळेच्या दरम्यान विविध कार्यशाळा परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. ॲग्रोव्हिजन च्या उद्घाटन कार्यक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधी, कृषी व संशोधन संस्थांचे पदाधिकारी, केंद्र व राज्य शासनाचे विभागातील अधिकारी व देशातील विविध भागातून आलेले शेतकरी उपस्थित होते

Advertisement

या प्रसंगी क्षेत्रीय लोक संपर्क ब्‍यूरो नागपूरच्‍या सहायक संचालिका श्रीमती मीना जेटली, क्षेत्रीय औरंगाबादचे सहायक संचालिक श्री निखील देशमुख, तांत्रिक सहायक श्री संजय तिवारी, सहायक, प्रदिप पवार आणि श्रीमती संजीवनी निमखेडकर उपस्‍थित होते. या प्रदर्शनीला पत्र सूचना कार्यालयाचे सहायक संचालिक श्री शशीन राय, आकाशवाणी, नागपूरच्‍या सहायक संचालिका श्रीमती गौरी मराठे, सहायक संचालक श्री मनोज सोनोने आणि अनेक मान्‍यवरांनी भेट दिली.

ह्या मल्टीमिडिया प्रदर्शनात अत्याधुनिक तंत्रज्ञान जसे मोठ्या एलईडी स्क्रिन, एलडीई पैनल, प्लाज्मा टीवी, आभासी वास्तविकता, वर्धित वास्तविकता, सेल्फी कॉर्नर, फ्लिप बुक, टीवी वर गेम्स सह ग्रामीण जीवन पद्धतिची सेटअप च्या माध्यमातून कृषी व ग्रामीण क्षेत्रातील केंद्र सरकारच्या विविध योजनांवर माहिती मिळणार आहे. ही चित्रप्रदर्शनी दिनांक 22 ते 25 नोव्हेंबर 2019 या कालावधित सकाळी 10 ते संध्या. 07 या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य चालू राहणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहून संपूर्ण कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केंद्र शासनाच्या क्षेत्रीय लोकसंपर्क ब्यूरो,नागपुर तर्फे करण्यात आले आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.