Advertisement
नागपूर : रामटेकच्या पाटगोवारी, आमडी, चिंचभुवन, नायकुंड आणि पारशिवनी तालुक्यातील एकूण 4 गावांतील सुमारे 900 शेतकऱ्यांची 3000 हजार एकर शेतजमीन एमआयडीसीकडे जाणार आहे.
या संदर्भात 18 डिसेंबर 2023 रोजी सरकारने अधिसूचनाही जारी केली. मात्र आपली जमीन देण्यास शेतकऱ्यांनी नकार दिला आहे.
जिल्ह्यातील पटगोवारी गावातील शेतकऱ्यांनी सामूहिक चर्चेनंतर या परिसरात येणाऱ्या एमआयडीसीला आपली शेतजमीन न देण्याचा निर्णय घेतला आहे.
सरकारने शेतकऱ्यांसोबत जोर-जबरदस्ती केली तर जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष रमेश कारेमोर व पंचायत समिती सदस्य कला ठाकरे यांच्या नेतृत्वात पटगोवारी गावातील शेतकरी सडीओ कार्यालयासमोर आंदोलन करतील.