मुंबई : राज्यातील सुशिक्षित बेरोजगार आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी दिलासादायक घडामोड समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाने प्रशासनातील रिक्त जागा भरण्यासाठी तब्बल ७० हजार पदांची मोठी भरती मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. आचारसंहिता संपताच ही प्रक्रिया गतीने राबवली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
उच्च शिक्षण क्षेत्रात ५,५०० प्राध्यापक पदे-
राज्यातील महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये अनेक वर्षांपासून प्राध्यापकांची हजारो पदे रिक्त आहेत. सध्या सुमारे ११ हजार पदे रिक्त असल्याचे सांगितले जाते. यापैकी पहिल्या टप्प्यात ५,५०० प्राध्यापकांची भरती करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा केली. तसेच विद्यापीठांच्या मुख्य कॅम्पसमधील सुमारे ७०० प्राध्यापक पदे देखील भरली जाणार आहेत. या निर्णयामुळे SET, NET आणि Ph.D. पात्र उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठीही हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.
२० हजार पदे MPSCमार्फत-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनातील कामकाज अधिक सक्षम करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. या ७० हजार पदांपैकी २० हजार पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत भरली जाणार आहेत.
या भरतीमध्ये राजपत्रित तसेच अराजपत्रित पदांचा समावेश असेल.
संभाव्य विभाग:
गृह विभाग – पोलीस पदे
महसूल विभाग – तलाठी, लिपिक
आरोग्य विभाग – विविध वैद्यकीय व तांत्रिक पदे
जिल्हा परिषद व इतर विभाग – प्रशासकीय कर्मचारी
भरती प्रक्रियेत पारदर्शकता राहावी यासाठी नियमांमध्ये आवश्यक बदल अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात आहे.
लवकरच जाहिराती-
आचारसंहितेमुळे रखडलेल्या भरती प्रक्रिया आता मार्गी लागण्याची शक्यता आहे. येत्या काही आठवड्यांत विविध विभागांकडून अधिकृत जाहिराती प्रसिद्ध होतील, अशी माहिती मिळत आहे.राज्यातील तरुणांसाठी ही भरती मोहीम रोजगाराच्या दृष्टीने मोठी संधी मानली जात आहे.
FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है...
नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews
मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews...
12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews
अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY





