Published On : Mon, Dec 13th, 2021
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात ओमायक्रॉनच्या एका रुग्णाची नोंद; सावधगिरी बाळगण्याचे मनपाचे आवाहन

Advertisement

नागपूर: नागपूरमध्ये ५ डिसेंबर रोजी पश्चिम आफ्रिकेहून आलेल्या एका रुग्णाचा जिनोम सिक्वेन्सिंग अहवाल सकारात्मक आढळून आला आहे, अशी माहिती मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिली. ५ डिसेंबर रोजी नागपूरात आलेल्या प्रवाशांच्या आर टी पी सी आर चाचणी करण्यात आली. सकारात्मक अहवाल आलेल्या रुग्णाची रिपोर्ट जिनोम सिक्वेंसिंग साठी पुणे एन आई वी मध्ये पाठविण्यात आला होता. त्या अहवालातील एका रुग्णाला ओमायक्रॉन असल्याचे आढळून आले.

आयुक्तांनी सांगितले की, या रुग्णांवर एम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्याची प्रकृती उत्तम आहे. तसेच ४० वर्षीय ओमायक्रॉन बधितामध्ये कोणतेही लक्षण नाहीत. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्व नागरिकांची सुद्धा तपासणी करण्यात आली.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

घाबरू नका, काळजी घ्या. ओमायक्रॉनचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी सर्व कोव्हिड नियमांचे पालन करावे, मास्क, शारीरिक अंतर आणि हात वेळोवेळी सॅनिटायजर करीत राहण्याचे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सर्व नागपूरकरांना केले आहे.

तसेच ज्या व्यक्तींना सर्दी, खोकला आहे अशांनी त्वरित तपासणी करून घ्यावी. सोबतच अजूनही लस न घेतलेल्या व्यक्तींनी लस घेण्यासाठी पुढे यावे. ज्यांनी पहिला डोज घेतला आहे आणि ८४ दिवस झाले आहे त्यांनी लवकर दूसरा डोज घ्यावा, असे आवाहनही मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.