Published On : Thu, Jul 23rd, 2020

रामटेक शहरात कोरोनाचा पुन्हा संसर्ग

Advertisement

दररोज रुग्णांच्या संख्येत होत आहे वाढ,रामटेक मध्ये निघाले पुन्हा दोन कोरोना पॉझिटिव्ह,ऑटो चालकासह सहाय्यक पोलिस शिपायालाही कोरोनाचे संक्रमण

रामटेक -नगरधन,हिवरा बाजार, मनसर, बोरडा, बंजार ( पथरई)आणि आता रामटेक शहरात पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातले आहे.मंगळवारी वॉर्ड जुना बस स्टॉप मयुर गार्डन जवळील वसाहतीत राहणाऱ्या ऑटो चालकाला कोरोनाचे संक्रमण दिसून आल्याचे आरोग्य अधिकारी रोहित भोईर यांनी सांगितले.

-तब्बल साडेतीन महिने कोरोना पासून लांब असलेल्या रामटेक शहरात कोरोनाचा शिरकाव सुरु झाला आहे.
रामटेक शहरात पुन्हा कोरोनाणे पाय पसरणे सुरू केले आहे. शहरात एका मागे एक रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे.
ऑटो चालकासह सहाय्यक पोलिस शिपाईला कोरोनाचे संक्रमण दिसून आल्याने संपूर्ण रामटेक शहरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सदर माहितीनुसार रामटेक येथे निरंतर सर्वेक्षनामधे दिनांक २२ जुलैला पोलिसांचे स्व्याब घेणे सुरू असताना त्या सहाय्यक पोलिस शिपाईला कोरोनाचे संक्रमण असल्याचे दिसुन आले. संपर्कात आलेल्या हाय रिस्क वाल्याना नागपूर येथे पाठवले आहे. आणि लो रिस्क मधल्या लोकांना क्वारनटाईन केले असून त्यांचे स्व्याब्ब घेण्यात आले आहे.असे पोलिस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी सांगितले

रामटेक पोलिस स्टेशन येथे ड्युटी करणारा कामठी वरून अप डाऊन करणारा सहाय्यक पोलिस शिपायाला कोरोनाचे संक्रमण दिसून आल्याने पोलिसांमध्ये देखील आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खुपियामध्ये काम करणाऱ्या ह्या मेजरला शुगर चां देखील त्रास असल्याचे समजले.
रामटेक शहर हे तालुक्याचे ठिकाण व पर्यटन स्थळ असल्याने असल्याने रोज अनेकांची धावपळ या शहराकडे असते यामुळे शहरात असुरक्षितेची भावना निर्माण झाली आहे. नुकतेच मिळालेल्या रुग्णाच्या अहवालाने प्रशासन खडबडून जागे झाले आहे.

तहसीलदार बाळासाहेब मस्के,
मुख्याधिकारी स्वरूप खारगे, पोलिस निरीक्षक दिलीप ठाकूर , सहायक पोलिस निरीक्षक दत्तप्रसाद शेंडगे, पोलिस निरीक्षक बारंगे,नगर परिषदचे अधिकारी सव्वालाखे , रोहित भोईर , व कर्मचारी गण तसेच रामटेक पोलीस प्रशासन हे परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. प्रशासन पूर्ण शरतीचे प्रयत्न करत आहे .प्रशासन वाढत असलेल्या कोरोना लढाईत पुढे अजून कोणती खबरदारी घेतील ही येणारी वेळ च सांगेल.

तहसीलदार बाळा साहेब मस्के यांच्याशी विचारणा केली असता,ऑटो रिक्षा चालकांच्या हाय रिस्क च्या संपर्कात आलेल्या रुग्णाची कुटुंब ऑटो चालक चा परिवार आणि एक खररे वाला असे ६ जन यांना नागपूर येथे पाठवण्यात आले आहे. आणि लो रिस्क मधे आलेल्या लोकांना होम क्वारांटन केले आहे.
पोलीस कर्मचारी च्या हाय रिस्क संपर्कात मधे बाजूलाच बसत असलेल्या एक महिला पोलिस कर्मचारी आली आहे. बाकी शोध घेणे सुरू आहे.आणि लो रिस्क मधे असलेल्या लोकांचे सव्याब टेस्ट घेण्यात आले आहे. नागरिकांनी आता स्वतःची काळजी घेणे खूप गरजेचे आहे.

मास्क लावूनच घरा बाहेर पडणे, बाहेरून आल्यावर आपले हात स्यानिटाईझ करणे, आता गरचेजे आहे, जर नागरिकांनी आताही काळजी घेतली नाही तर कोरोना घराघरात पोहोचेल. असे बाळा साहेब मस्के यांनी जनतेला आवाहन केले.