Published On : Mon, Jul 6th, 2020

रविंद्र सावंत महावितरणच्या वित्त संचालकपदी रुजू

मुंबई : महावितरणचे नवीन संचालक (वित्त) म्हणून श्री. रवींद्र सावंत यांनी नुकताच कार्यभार स्वीकारला. याआधी ते एमआयडीसीचे मुख्य वित्त व लेखाधिकारी म्हणून कार्यरत होते.

संचालक (वित्त) श्री. रवींद्र सावंत हे मूळ कडेगाव तालुक्यातील भिकवडी खुर्द (जि.सांगली) येथील मूळ रहिवासी असून कोल्हापूर विद्यापीठातून त्यांनी रसायनशास्त्रात या विषयातील पद्व्युत्तर पदवी संपादन केली आहे.

यापूर्वी श्री. सावंत यांनी नॅशनल हेल्थ मिशनचे संचालक (वित्त), महानंदचे व्यवस्थापकीय संचालक आणि विधानभवन उपसचिव तथा वित्त नियंत्रण म्हणून मुंबई येथे काम पाहिले आहे.