Published On : Sun, Dec 15th, 2024
By Nagpur Today Nagpur News

भजप प्रदेशाध्यक्षपदाच्या नावासाठी रविंद्र चव्हाण यांच्या नावाची चर्चा

Advertisement

नागपूर : महायुती सरकारचा शपथविधी सोहळा आज पार पडणार आहे. यात तिन्ही पक्षांचे एकूण 40 आमदार मंत्रीपदाची शपथ घेतील. चंद्रशेखर बावकुळे हे देखील मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती असून माजी कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण हे भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष होतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

चव्हाण यांनी नुकतीच अमित शाहांची दिल्लीत भेट घेतल्याची माहिती आहे. रविंद्र चव्हाण डोंबिवली मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. चव्हाण हे देवेंद्र फडणवीस यांचं अत्यंत जवळचे सहकारी आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळात ते मंत्री देखील आहेत. गेल्या तीन निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला आहे आणि आता चौथ्यांदाही आमदार म्हणून निवडून आले आहे.
हे पाहता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप पक्षश्रेष्ठींकडून रविंद्र चव्हाण यांची महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Gold Rate
Sept 16,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 52,400 /-
Gold 22 KT ₹ 1,41,400 /-
Silver/Kg ₹ 2,33,000/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.