Advertisement
नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्य महावितरण कार्यालयात आदरांजली अर्पण करण्यात आली. काटोल रोड येथील कार्यालयात आयोजित कार्यक्रमात मुख्य अभियंता (गुणवत्ता नियंत्रण) सुहास रंगारी यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आदरांजली अर्पण केली. यावेळी अधीक्षक अभियंता नारायण आमझरे, उमेश शहारे, प्रणाली विश्लेषक प्रवीण काटोले, उप व्यवस्थापक (वित्त व लेखा)अतुल राऊत, सहायक महाव्यवस्थापक (मानव संसाधन)वैभव थोरात, उप मुख्य औदयोगिक संबंध अधिकारी मधुसुदन मराठे उपस्थित होते.
Advertisement