Published On : Tue, May 18th, 2021

भंडारा जिल्ह्यात आढळले दुर्मिळ खवले मांजर

Advertisement

वन विभागाने सोडले निसर्गाच्या सानिध्यात

भंडारा: भंडारा वन परिक्षेत्रातील सोनेगाव येथील सुरेश शामराव शहारे यांच्या शेतात दुर्मिळ खवले मांजर हा वन्यप्राणी आढळून आला. ही माहिती वन विभागास मिळताच उपवनसंरक्षक एस. बी. भलावी यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाच्या बचाव पथकाने सदर खवले मांजर या वन्यप्राण्यास ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय तपासणी केली व नजीकच्या वनक्षेत्रात निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिले.

Gold Rate
29 dec 2025
Gold 24 KT ₹ 1,39,100/-
Gold 22 KT ₹ 1,29,400 /-
Silver/Kg ₹ 2,49,700/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सदर खवले मांजराच्या एकूण 8 प्रजाती अस्तित्वात असून सर्व प्रजातींची त्याच्या खवल्यासाठी शिकार केली जात असल्याने इंटरनॅशलन युनिअन फॉर कंझरवेशन ऑफ नेचरने खवले मांजराच्या सर्व प्रजातींना रेड लिस्ट मध्ये समाविष्ट करून क्रीटीकली एनडेजेर्ड घोषित केले आहे. खवले मांजराच्या खवल्यांना चायनीज औषधशास्त्रामध्ये खुप मागणी असल्याने त्याची शिकार करण्याची शक्यता असते. सदर वन्यप्राणी मुंग्या, उधळी खाऊन जगतो.

खवले मांजर हा वन्यप्राणी अतिशय दुर्मिळ असल्याने त्याचे संरक्षण करणे गरजेचे आहे. त्यामुळे त्याची शिकार व विक्री भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अन्वये गुन्हा असून त्यात कठोर शिक्षेचे प्रावधान आहे. त्यामुळे खवले मांजर सदृष्य कुठल्याही वन्यप्राण्यास ईजा न करता वन विभागाला सुचित करावे असे आवाहन वन विभागामार्फत करण्यात आले आहे.

सदर कार्यवाही उपवनसंरक्षक भंडारा एस. बी. भलावी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक राजुरकर यांच्या नेतृत्वाखाली आर आर यु पथकाचे अनिल शेळके, वाहन चालक, वनरक्षक निलेश श्रीरामे, मानद वन्यजीव रक्षक भंडारा शाहिद खान, नदीम खान यांच्या सल्ल्यानुसार पार पडली.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement