Published On : Mon, Jul 6th, 2020

रॅपिड अँटीजन टेस्टला सुरुवात पहिल्या दिवशी कामठी येथे चाचणी, 31 पैकी 31ही अहवाल निघाले निगेटिव्ह

Advertisement

कामठी : -कामठी तालुक्यात कोरोना संसर्गाची जलद चाचणी करणाऱ्या रॅपिड अँटीजन टेस्टचे 100 किट प्राप्त झाले.आज या किट चा वापर सर्वप्रथम कामठी येथील हुतात्मा स्मारक येथील स्वॅब कलेक्शन सेंटर वर करण्यात आला.याठिकाणी 31 जणांचे नमुने तपासल्यानंतर त्यातील 31 ही अहवाल निगेटिव्ह असल्याचे निदर्शनास आले,अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्रद्धा भाजीपाले यांनी दिली.

आज सर्वप्रथम रॅपिड अँटीजन टेस्ट कामठी येथे वापरण्यात आल्या. तेथे सर्वेक्षणा नंतर संदिग्ध व जोखमीचे वाटणारे व्यक्तींच्या चाचण्या झाल्या. त्यातील 31 पैकी 31 ही चाचण्या निगेटिव्ह आल्याचे डॉ. भाजीपाले यांनी सांगितले.
दरम्यान शासनाकडून पहिल्यांदा 100 किट्स तालुका प्रशासनाला प्राप्त झाल्या. नंतर २०० किट्स लगेचच प्राप्त होणार आहेत. रिपीड टेस्ट किट्सचा वापर कामठी तालुक्यात प्रथमतः होत आहे,हे ही डॉ.भाजिपपाले यांनी स्पष्ट केले.

आता हे 31रुग्ण कोणतेही लक्षणं न दिसणारे रुग्ण आहेत,
कामठी येथे या चाचण्या पार पाडण्यासाठी तहसीलदार अरविंद हिंगे , बीडीओ सचिन सूर्यवंशी, न.प.मुख्याधिकारी रमाकांत डाके तालुका आरोग्य अधिकारी डॉ अश्विनी फुलकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ श्रद्धा भाजीपाले, वैद्यकीय अधिकारी डॉ शबनम खानुनी,प्रतिभा कडू, व पोलीस निरीक्षक संतोष बाकल, पोलीस निरीक्षक देविदास कठाळे यांच्या संयुक्त पथकाने परिश्रम घेतले.

अशी झाली रॅपिड अँटीजन टेस्ट
या चाचणीत संदिग्ध व्यक्तीच्या नाकाच्या आतील स्त्राव घेतला गेला हा स्त्राव व्हिटीएम द्रावणात मिसळला गेला. या द्रावणाचे किटच्या टेस्ट पट्टीच्या एका टोकाला टाकला गेला. या पट्टीच्या दुसऱ्या टोकाला एक बारीक गुलाबी रेघ होती . सुमारे २५ ते ३० मिनिटात स्त्राव मिश्रीत द्रावण हे पट्टीच्या वरच्या भागापर्यंत पोहोचली. तर तेथे आणखी एक गुलाबी रेघ तयार झाली तर स्त्राव नमुना पॉझिटिव्ह आहे,असे समजले जाते, पण आजच्या तपासणीत आणखी एक गुलाबी रेघ तयार न झाल्याने 31 ही लोकांचे अहवाल हे निगेटिव्ह आले

तहसीलदार अरविंद हिंगे यांचे आव्हान
रॅपिड अँटीजेन टेस्ट मुळे तात्काळ तपासणी ची सोय झाली आहे. तालुक्यात या माध्यमातून जास्तीत जास्त तपासणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, यामुळे पॉझिटिव्ह रुग्ण प्राथमिक अवस्थेतच ओळखता येतो. त्यामुळे लोकांनी तालुक्यात होत असलेल्या चाचण्यांना प्रतिसाद द्यावा. सर्वेक्षणात आरोग्य पथकांनी निर्धारित केल्यानुसार संदिग्ध व जोखमीच्या आणि दुर्धर आजार ग्रस्त लोकांनी आपले नमुने देण्यासाठी पुढे यावेत व तपासणी करून घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे,असे आवाहन तहसिलदार अरविंद हिंगे व बीडीओ सचिन सूर्यवंशी यांनी केले आहे.

संदीप कांबळे कामठी