Published On : Tue, Sep 29th, 2020

नागपुरात 15 वर्षीय तरुणीवर बलात्कार, चार आरोपींना अटक

Advertisement
RAPE

Representational pic

नागपूर : नागपुरात अल्पवयीन मुलीवर बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे (Rape on girl in Nagpur). ही घटना दीड महिन्यापूर्वी नारा गावाजवळ घडली होती. दीड महिन्यानंतर पीडित 15 वर्षीय तरुणीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे (Rape on girl in Nagpur).

पीडितेच्या घराजवळ राहत असलेला आरोपी यश मेश्राम याला पोलिसांनी अटक केली आहे. त्यासोबतच इतर तीन अमित बोलके, अभिनेश देशभ्रतार, रितिक मोहरले यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस सध्या या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत.

बलात्कारानंतर आरोपींनी पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली होती. या घटनेमुळे पीडित तरुणी घाबरलेली होती. मात्र दीड महिन्यानंतर पीडितेच्या तक्रारीनुसार चार आरोपींनी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

दरम्यान, नुकतेच नागपुरात दिवसा ढवळ्या गँगस्टार बाळ्या बिनेकरची हत्या करण्यात आली आहे. या हत्येने नागपूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना अटक केली असून पोलीस अधिक चौकशी करत आहे

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.